Benefits of Drinking Warm Water : कोमट पाण्यामुळे खरच वजन कमी होतं? जाणून घ्या सत्य

Warm Water Benefits : पाणी थंड असो वा गरम ते आरोग्यासाठी फायदेशीर असतं. परंतु थंड पाण्याच्या तुलनेत कोमट पाणी शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे. एका संशोधनानुसार कोमट पाणी प्यायल्याने शरीराला 8 फायदे पोहोचतात.

healthy benefits  of drinking warm water
कोमट पाणी पिण्याचे फायदे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पाणी थंड असो वा गरम ते आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
  • परंतु थंड पाण्याच्या तुलनेत कोमट पाणी शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे.
  • एका संशोधनानुसार कोमट पाणी प्यायल्याने शरीराला 8 फायदे पोहोचतात.

Warm Water Benefits : पाणी थंड असो वा गरम ते आरोग्यासाठी फायदेशीर असतं. परंतु थंड पाण्याच्या तुलनेत कोमट पाणी शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे. एका संशोधनानुसार कोमट पाणी प्यायल्याने शरीराला 8 फायदे पोहोचतात. कोमट पाणी प्यायल्याने पचनशक्ती मजबूत होते, शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, वजन कमी होते, शरीरात कुठे दुखत असेल तर ते कमी होतं, ताण कमी होतो, सायनस आटोक्यात येतो तसेच सर्दी खोकलाही बरा होतो. इतकेच नाही तर चहा आणि कॉफी प्यायल्यामुळे जे शरीराला नुकसान होतं, कोमट पाण्यामुळे तो होत नाही. एका संशोधनानुसार कोमट पाणी शरीरात औषधासारखं काम करतं. कोमट पाण्याचा आणखी फायदा होण्यासाठी त्यात विटामिन सी युक्त पदार्थ घालावे. (drinking warm water at morning can reduce your weight health tips in marathi)

अधिक वाचा :  Brain Aging signs: तुमचा मेंदू ‘म्हातारा’ होतोय का? सांगतात ही लक्षणं, तिशीनंतर व्हा सावध

वजन कमी करण्यासाठी कोमट पाणी पिण्याचा पर्याय उत्तम आहे. यात व्यक्तीला कुठला आजार असेल तर तोही बरा होतो. त्याशिवाय कोमट पाण्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्याचा पर्यात अनेक ठिकाणी स्विकारला जातो. ज्यांना व्यायाम करायला वेळ नाही तसेच डाएट करणेही शक्य होत नाही अशा लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे फायदेशीर ठरते. 

अधिक वाचा : Home Remedies For Cough: थंडीत खोकल्याची खूप समस्या असते, जाणून घ्या खोकला टाळण्यासाठी DIY टिप्स

कोमट पाणी पिण्याचे फायदे 

शरीरातील फॅट कमी करण्यासाठी कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कोमट पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होतं असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये आपण जात तेल आणि मसाल्यांचे पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. अशा वेळी कोमट पाणी प्यायल्यास शरीरातून विषारी पदार्थ  काढणे गरजेचे असते. अशा वेळी  कोमट पाणी प्यायल्यास फरक पडतो. 

अधिक वाचा : Artificial Eggs:बाजारात मिळणारी बनावट अंडी बिघडवू शकतात तुमचं आरोग्य; कसं ओळखाल बनावट अंडी

पचनशक्ती होते मजबूत

सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास पचनशक्ती मजबूत होते. मेटाबॉलिज्म बूस्ट होतो. तुमच्या शरीराची मेटाबॉलिज्म जितकी चांगली असते तितके तुम्ही जास्त ऍक्टिव्ह राहता. तसेच कोमट पाणी प्यायल्याने फार भूक लागत नाही. त्यामुळे कोमट पाणी प्यायल्यास ओवर इटींगची गरज पडत नाही आणि वजन वाढत नाही. 

अधिक वाचा : Day Snoring : सावधान! दिवसा घोरणे तुम्हाला बनवू शकते आंधळे, समोर आले नवे संशोधन... लाखो लोकांना धोका!

हर्बल टी चा वापर

सकाळी रिकाम्या पोटी हर्बल टी वापरल्यास शरीरातू विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसेच दररोज व्यायाम केल्यास वजन लवकर कमी होण्यास मदत होते. 

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी