Health Tips: रोज सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्यानं आरोग्यासाठी किती चांगले की वाईट

सकाळी रिकाम्या पोटी (Empty stomach) पाणी प्यायले पाहिजे, त्यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात, असं तुम्हाला तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं असेल. याशिवाय हायड्रेटेड (Hydrated) राहण्यासाठी पाणी पिणेही खूप महत्त्वाचे असते. आवश्यकतेपेक्षा कमी पाणी (water) प्यायल्याने पोट आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

Drinking water without brushing every morning good or bad
रोज सकाळी ब्रश न करता पाणी पिणे योग्य आहे का अयोग्य   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टर देतात.
  • सकाळी ब्रश न करता पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे.
  • जर तुम्हाला उच्च रक्तदाब आणि मधुमेह असेल तर तुम्ही सकाळी पाणी प्यावे.

Drink water before brushing: नवी दिल्ली :  सकाळी रिकाम्या पोटी (Empty stomach) पाणी प्यायले पाहिजे, त्यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात, असं तुम्हाला तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं असेल. याशिवाय हायड्रेटेड (Hydrated) राहण्यासाठी पाणी पिणेही खूप महत्त्वाचे असते. आवश्यकतेपेक्षा कमी पाणी (water) प्यायल्याने पोट आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. या कारणामुळे दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टर देतात. त्याचवेळी, काही लोकांचा असाही विश्वास आहे की सकाळी ब्रश न करता पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे. ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी खरच फायदेशीर आहे का? हे आपण जाणून घेणार आहोत. 

लोकांचा असा विश्वास आहे की सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. याशिवाय तोंडात बॅक्टेरिया जमा होणार नाहीत. 
सकाळी रिकाम्या पोटी ब्रश न करता पाणी पिणे देखील आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली करत असते. ज्यांना सर्दी लवकर लागते त्यांनी सकाळी पाणी प्यावे. 
ब्रश न करता पाणी प्यायल्याने तुमचे केस मजबूत आणि चमकदार होतात आणि त्वचेत चमकही राहते. याशिवाय पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता, तोंडात व्रण येणे, करपट ढेकर येणे इ.जर तुम्हाला उच्च रक्तदाब आणि मधुमेह असेल तर तुम्ही सकाळी पाणी प्यावे. याशिवाय सकाळी रिकाम्या पोटी ब्रश न करता पाणी प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी