Weight loss: जर्दाळू खाल्ल्यानं झपाट्यानं कमी होते पोटाची चरबी, जाणून घ्या फायदे

तब्येत पाणी
Updated Jul 01, 2019 | 17:13 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

वजन कमी करण्यासाठी प्रत्येकवेळी महागडी उत्पादनांचा वापर करणं गरजेचं नाही. दररोजच्या आहारातील काही महत्त्वाच्या पदार्थांमुळेही वजन कमी करण्यात मदत होते. जाणून घ्या वजन कमी करण्यात उपयुक्त असलेल्या जर्दाळूबद्दल.

Apricot for Weight Loss
जर्दाळू खाल्ल्यानं झपाट्यानं कमी होते पोटाची चरबी  |  फोटो सौजन्य: Getty Images

Weight Loss Tips: आजकाल धावपळीच्या आयुष्यात अनेकांना लठ्ठपणा सतावतोय. वाढलेलं वजन ही आज प्रत्येकाची समस्या बनतंय. मग स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अनेक जण जिममध्ये जाणं, योगा करणं, विविध प्रकारच्या एक्सरसाईज आणि वेगवेगळे डाएट्स करतांना आपल्याला दिसून येतात. योग आणि व्यायाम हा शरीरासाठी नक्कीच फायदेशीर आहे. पण डाएटच्या नावाखाली उपाशी राहणं योग्य नाही, त्यामुळे अनेकदा आजारांचा विळखा शरीराला पडतो. त्याऐवजी योग्य आणि संतुलित आहार घेतल्यानं वजन आटोक्यात राहतं. शिवाय काही पदार्थांमुळे वजन कमीही करता येतं.

फळं, भाज्या आणि योग्य संतुलित आहार ठेवल्यास खूप चांगल्या पद्धतीनं वजन कमी करता येतं. त्यातच जर्दाळू म्हणजेच ड्राईड अप्रिकोट यालाच हिंदीमध्ये खुबानी म्हणतात. हे फळ वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं आणि ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. जर्दाळूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि इतर पोषक तत्व असतात. फायबरचा एक महत्त्वपूर्ण स्रोत म्हणजे जर्दाळू होय. फायबर मोठ्या प्रमाणात असल्यानं जर्दाळू खाल्ल्यानं वजन कमी होतं आणि गॅस्ट्रिक आजारांपासूनही आपला बचाव होतो.

जाणून घ्या जर्दाळूचे आणखी फायदे

जेवणावर नियंत्रण ठेवतं

जर्दाळूमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि कमी प्रमाणात कॅलरीज असतात. दररोज नाश्ता करतांना जर आपण जर्दाळू खाल्लं तर त्यामुळे आपलं वजन झपाट्यानं कमी होऊ शकतं आणि आरोग्यही चांगलं राहतं. जर्दाळू खाल्ल्यानं भूकेवर ताबा मिळवता येतो आणि सतत काही खाण्याची इच्छा होत नाही.

पचनशक्ती चांगली होते

आपल्या शरीरातील पचनशक्ती जर चांगली नसेल तर लठ्ठपणा वाढतो. यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपली पचनक्रिया योग्य व्हावी. जर्दाळू एक असं फळ आहे की ज्यात इतर फळांच्या तुलनेनं फायबर मोठ्या प्रमाणात असतं. दररोज जर्दाळू खाल्ल्यास आपली पचनशक्ती वाढते आणि पोटाच्या सर्व समस्या दूर होतात आणि त्यामुळे साहजिकच वजन वाढत नाही.

जर्दाळू अशाप्रकारे खा जेणेकरून वजन कमी होईल

जर आपण लठ्ठपणा कमी करून आपलं वजन नियंत्रित ठेवण्याचा विचार करत असाल, तर नियमितपणे जर्दाळू खा. जर्दाळू आपण सॅलेडच्या रुपात लिंबू पिळूनही खाऊ शकता. जर्दाळूची चव चांगली असते त्यामुळे ते खातांना आपल्याला काही वाटणार नाही. सोबतच आपण जर्दाळूचं लोणचं बनवूनही खाऊ शकतो.

जर्दाळूच्या लोणच्यामध्ये प्रोबायोटिक्स असतं, ज्यामुळे पचनतंत्र उत्तेजित होतं आणि ते आतड्यांसाठीही फायदेशीर ठरतं. शिवाय आपण जर्दाळूचा ज्यूस पण पिऊ शकतो किंवा ब्रेडसोबतही ते खाता येतं.

जर आपल्याला वजन कमी करायचं आहे तर नियमितपणे जर्दाळूचं सेवन करावं. हे खाल्लास व्यायाम न करताही आपलं वजन झपाट्यानं कमी होईल आणि आरोग्यासाठी जर्दाळू चांगलं असल्यामुळे आजारांपासूनही आपला बचाव होईल.

नोट: वरील लेखामध्ये सुचवलेल्या टिप्स आणि सल्ला म्हणजे सामान्य माहिती आहे. त्याचा वापर करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्यावा.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Weight loss: जर्दाळू खाल्ल्यानं झपाट्यानं कमी होते पोटाची चरबी, जाणून घ्या फायदे Description: वजन कमी करण्यासाठी प्रत्येकवेळी महागडी उत्पादनांचा वापर करणं गरजेचं नाही. दररोजच्या आहारातील काही महत्त्वाच्या पदार्थांमुळेही वजन कमी करण्यात मदत होते. जाणून घ्या वजन कमी करण्यात उपयुक्त असलेल्या जर्दाळूबद्दल.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola