Health News | मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये लठ्ठपणा ही खूप सामान्य समस्या झाली आहे. लठ्ठपणा वाढल्याने अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो. यासाठी तुमचा आहार आणि काही सवयी जबाबदार आहेत. लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी एक म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी होणे. संशोधकांचे म्हणणे आहे की वजन कमी केल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या दुप्पट होऊ शकते. डेनमार्कमधील शास्त्रज्ञांनी यासाठी एक अभ्यास केला ज्यामध्ये ५६ पुरुषांचा समावेश होता. (Due to this one mistake, the number and quality of sperm becomes useless).
अधिक वाचा : विमान अपघातात ठाण्यातील चार जणांसह सर्व प्रवाशांचा मृत्यू
दरम्यान, अभ्सासासाठी सामील असलेल्या सर्व लोकांना ८ आठवडे डाएटवर ठेवण्यात आले आणि दररोज फक्त ८०० कॅलरीज देण्यात आल्या. अभ्यासाच्या सुरुवातीला ज्या पुरुषांचे बीएमआय ३२ होते त्यांचे या काळात १६.५ किलो वजन कमी झाले. तसेच अभ्यासादरम्यान या सर्व पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येत ४१ टक्के वाढ देखील नोंदवली गेली. अभ्यासादरम्यान, ज्या लोकांचे वजन कमी झाले आणि लोकांचे वजन कमी झाले आणि ज्या लोकांनी आपल्या कमी वजनावर नियंत्रण ठेवले त्यांच्यामध्ये शुक्राणूंची संख्या दुप्पट असल्याचे दिसून आले. लक्षणीय बाब म्हणजे कोपनहेगन विद्यापीठातील तज्ञांना असेही आढळून आले की ज्या लोकांच्या पोटावर जास्त चरबी होती त्यांच्या वीर्याचा दर्जा खूपच खराब होता.
पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या १७ ते ४० वर्षांपर्यंत जास्त प्रमाणात असते, त्यानंतर ते कमी होऊ लागते. दरम्यान वीर्य प्रति मिलीलीटर १५ दशलक्ष शुक्राणू असणे सामान्य शुक्राणूंची संख्या मानली जाते. कालांतराने पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊ लागली आहे. यासाठी शास्त्रज्ञ लठ्ठपणा, चुकीचा आहार आणि प्रदूषणाला जबाबदार धरत आहेत.
शुक्राणूंची संख्या कमी असल्यामुळे आजच्या काळात अनेक विवाहित जोडप्यांना मुल होताना अडचणी येत आहेत. यापूर्वी लठ्ठपणाबाबत असे सांगण्यात आले होते की ते पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करते, ज्यामुळे शुक्राणूंचे उत्पादन कमी होते. यापूर्वी यूटा विद्यापीठातील शास्त्रज्ञांना असे आढळून आले होते की लठ्ठ लोकांमध्ये त्यांच्या वयाच्या इतर लोकांच्या तुलनेत शुक्राणूंची संख्या खूप कमी असते.
डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.