E Cigarette side effects: ई-सिगरेटमुळे हृदयरोगाचा धोका, धूर काढण्याचा नाद पडेल महागात

अमेरिकन हार्ट असोसिएशनमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ई-सिगरेट ओढल्यानंतर 15 मिनिटांच्या आत लोकांचा हृदयाचे ठोके वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आपल्या शरीराचा ‘फाईट अँड फ्लाइट’ मोड कार्यरत होतो.

E Cigarette side effects
ई-सिगरेटमुळे हृदयरोगाचा धोका  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ई-सिगरेटही नॉर्मल सिगरेटइतकीच असते घातक
  • अचानक वाढू शकतात हृदयाचे ठोके
  • ई-सिगरेटमुळे वाढते हार्ट अटॅक येण्याची शक्यता

E Cigarette side effects: गेल्या काही दिवसांमध्ये ई-सिगरेट (E cigarette) पिण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. ई-सिगरेट ओढणाऱ्या तरुणांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढत चालल्याचं चित्र आहे. ही सिगरेट नॉर्मल सिगरेटच्या तुलनेत कमी धोकादायक (Dangerous) असल्याचा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र प्रत्यक्षात हे खरं नाही. ई-सिगरेटदेखील हृदयाच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरण्याची शक्यता असते. जे लोक नियमितपणे ई-सिगरेटचं सेवन करतात, त्यांचं हृदय आणि ब्लड व्हेसल्स यांचं कार्य बाधित होत असल्याचे अनुभव अनेकदा येतात. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब सिद्ध झाली आहे. नॉर्मल सिगरेटप्रमाणंच ई-सिगरेटही हानीकारक असल्याचं दिसून आलं आहे. 

काय असतो फरक?

अमेरिकन हार्ट असोसिएशनमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ई-सिगरेट ओढल्यानंतर 15 मिनिटांच्या आत लोकांचा हृदयाचे ठोके वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आपल्या शरीराचा ‘फाईट अँड फ्लाइट’ मोड कार्यरत होतो. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तदाबदेखील वाढतो. अशा परिस्थितीत हृदयावरील दबाव वाढतो आणि अधिक ऑक्सिजनची गरज निर्माण होते. त्यामुळे आर्टरी वॉल्स डॅमेज होण्याचा धोका असतो. याविषयी संशोधन करणाऱ्या टीमच्या निरीक्षणानुसार साधी सिगरेट किंवा ई-सिगरेट पिणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके अचानक वाढतात. ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट कमालीचा वाढतो आणि ब्लड व्हेसल्स टोनमध्ये बदल होतात. ई-सिगरेटच्या सवयीमुळे ब्रेन डॅमेज होण्याचाही धोका असतो. 

अधिक वाचा - Desi Ghee Benefits: चेहरा बनवा तुकतुकीत आणि चमकदार, ‘देशी तुपा’चा असा करा वापर

तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं वाढतं प्रमाण

गेल्या काही महिन्यांपासून देशात आणि जगभरात हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढत चाललं आहे. विशेषतः तरुण मुलं हार्ट अटॅकची शिकार होत असल्याचं चित्र आहे. धुम्रपानाचं वाढतं प्रमाण हेदेखील त्यामागील एक कारण असल्याचं सिद्ध झालं आहे. स्मोकिंगची सवय तरुणांमध्ये हार्ट अटॅक आणि इतर गंभीर शारीरिक आजारांना निमंत्रण देत असल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. त्यामुळे सर्व तरुणांनी व्यसनांपासून दूर राहण हाच हृदय सुरक्षित ठेवण्याचा उत्तम मार्ग असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. 

अधिक वाचा - Cough and Cold: वेळोवेळी नाक साफ करत नसाल, तर होऊ शकतो अल्झायमर! वाचा, नव्या अभ्यासातील धक्कादायक नोंदी

जीवनशैलीत बदल आवश्यक

गेल्या काही वर्षात बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, कामाच्या उलटसुलट वेळा आणि अपुरी झोप याचा परिणाम आपल्या हृदयावर होत असल्याचं दिसून आलं आहे. यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे लाईफस्टाईल आजार मूळ धरण्याचं प्रमाण वाढत आहे. त्याचप्रमाणे वाढते ताणतणाव तरुणांना व्यसनाधीनतेकडे खेचत असल्याचंही दिसून येत आहे. त्यासाठी चांगली जीवनशैली, सात्विक आहार आणि पुरेशी झोप ही त्रिसुत्री कायम लक्षात ठेवण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात येतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी