Home remedies for Dark Neck : नवी दिल्ली : त्वचा हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग असतो. सुंदर त्वचेमुळे (Beautiful Skin)आपले व्यक्तिमत्व खुलून येते. मात्र प्रदूषण, ऋतुमानातील बदल, वाढते वय याचा त्वचेवर परिणाम होत असतो. अनेकदा उन्हाळ्यात आपली त्वचा रापते किंवा काळपटते. तीव्र ऊन, सूर्यप्रकाश आणि घाम यामुळे त्वचा काळी (Dark Skin) पडते. त्वचा काळपटण्यालाच टॅनिंग (Tanning)असेही म्हणतात. एरवी आपण चेहऱ्याची त्वचा सुंदर दिसावी म्हणून प्रयत्न करतो. मात्र मानेच्या त्वचेकडे आपले दुर्लक्ष होत असते. चेहऱ्याला टॅनिंग होण्यापासून वाचवण्यासाठी आपण सर्व प्रकारचे उपाय करत असलो तरी मानेची त्वचा काळी (Dark Neck) पडण्याकडे दुर्लक्ष करतो. मानेवरील काळेपणा संपूर्ण चेहऱ्याच्या सौंदर्यावरच नाही तर आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम करतो. पाहूया मानेचा काळपटपणा घालवण्याचे उपाय. (Easy home remedies to remove darkness on neck)
अधिक वाचा - Math Teacher Dance Video: बाईंचा डान्स पाहून गुरुजींना घालता येईना आवर, ठुमके पाहून फुटेल हसू
1. मध आणि लिंबू
एका वाटीत एक चमचा लिंबाचा रस आणि तेव्हढेच मध घ्या. त्यानंतर त्यांना एकत्र करून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट मानेवरील काळ्या पडलेल्या भागावर चोळा. या उपायाने मानेवरील डाग दूर होतील आणि त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही.
अधिक वाचा - Police saved life: चालत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पोलिसाने वाचवलं मृत्यूच्या दाढेतून, पाहा VIDEO
2. दूध, हळद आणि बेसन
दूध, हळद आणि बेसन यांची पेस्टदेखील मानेचे टॅनिंग दूर करण्यासाठी फायद्याची ठरते. ही खास पेस्ट तयार करण्यासाठी प्रत्येकी एक चमचा दूध आणि बेसन घ्या आणि त्यात चिमूटभर हळद मिसळा. ही पेस्ट मानेच्या प्रभावित भागावर लावा आणि कोरडी होऊ द्या. आता मानेला चोळताना स्वच्छ पाण्याने धुवा. असे काही दिवस केल्यावर तुम्हाला मानेचा काळपट दूर होताना दिसेल.
3. लिंबू आणि बेसन
एका वाटी लिंबाचा रस आणि बेसन एकत्र करून त्यांची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट मानेवर लावा आणि तिला कोरडी होऊ द्या. थोड्या वेळानंतर मानेला घासून पाण्याने स्वच्छ करा.
अधिक वाचा - Diabetes Control : ही 5 हिरवी पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहेत वरदान...पाहा जबरदस्त फायदे
4. दही आणि कच्ची पपई
हे कॉम्बिनेशनदेखील टॅनिंग दूर करण्यासाठी उपयुक्त असते. प्रथम कच्ची पपई चांगली बारीक करून घ्या. त्यानंतर त्यात दही आणि गुलाबजल मिसळून त्यांची चांगली पेस्ट बनवा. आता ही पेस्ट मानेवर घासून लावा आणि त्याला कोरडे होऊ द्या. नंतर ती धुवून टाका. नियमितपणे वापरल्यास त्यामुळे मानेवरील काळेपणा कमी होऊ लागतो.
त्वचेची नियमित काळजी घेतल्यास त्यातील ताजेपणा आणि टवटवीतपणा टिकून राहतो आणि आपले व्यक्तिमत्व खुलून येते.
(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे प्रयोग करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)