Knee Grease Remedies : गुडघ्यातलं वंगण कमी होतंय? या तीन घरगुती उपायांनी दीर्घकाळ राहाल फिट

गुडघेदुखीची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय रामबाण ठरतात. या उपायांनी गुडघ्यातील वंगण कमी होण्याच्या समस्येवर उपाय मिळू शकतो.

Knee Grease Remedies
गुडघ्यातलं वंगण वाढवण्याचे सोपे उपाय  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वयोमानानुसार सुरू होते गुडघेदुखी
  • गुडघ्यातील वंगण कमी झाल्यामुळे वाढते वेदना
  • घरगुती उपायांनी दूर होते समस्या

Knee Grease Remedies : वयोमानानुसार गुडघे दुखण्याची (knee pain) समस्या अनेकांना जाणवते. विशेषतः तरुणपणात ज्यांच्या गुडघ्यांचा जास्त वापर होतो, त्यांचे गुडघे तुलनेनं लवकर दुखायला सुरुवात होते. याशिवाय चुकीची लाईफस्टाईल, चुकीची आहारपद्धती (Lifestyle and diet) यासारखे इतर अनेक घटक याला कारणीभूत ठरतात. गुडघे दुखण्याचं एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे गुडघ्यातलं वंगण कमी होणं. गुडघ्यातलं वंगण (grease) कमी झाल्यामुळे प्रत्येक हालचाल करताना वेदना व्हायला सुरुवात होते. उठताना, बसताना, चालताना, फिरताना, उडी मारताना गुडघ्यांमध्ये वेदना जाणवायला सुरुवात होते. वयोमानानुसार गुडघ्यांच्या तक्रारी तर सुरू होतातच, मात्र अनेकदा तरुण वयातच गुडघ्यातलं वंगण कमी झाल्यामुळे हे त्रास जाणवायला सुरुवात होते. काही घरगुती उपायांनी हे वंगण पुन्हा वाढवता येऊ शकतं आणि गुडघेदुखीपासून सुटका करून घेता येऊ शकते. त्यासाठी तीन साधे पण परिणामकारक उपाय करण्याचा सल्ला दिला जातो. 

आहार

गुडघ्यांचं दुखणं ठीक करण्यासाठी उत्तम आहार घेण्याची गरज आहे. या समस्येवर मात करण्यासाठी भरपूर व्हिटॅमिन आणि मिनरल असलेला आहार घेण्याचा सल्ला देण्यात येतो. रोजच्या आहारात ताज्या आणि हिरव्या भाज्यांचं सेवन करावं. त्याचप्रमाणे रोजच्या जेवणात लसूण, आलं, कांदा, ग्रीन टी आणि हळद यांचं सेवन सुरू करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. यातील पोषक घटकांमुळे गुडघेदुखीपासून दिलासा मिळण्याचा प्रवास सुरू होतो.

व्यायामाची गरज

गुडघेदुखीपासून सुटका करून घेण्यासाठी नियमित व्यायामाला पर्याय नाही. रोजच्या रोज व्यायामाला सुरुवात केली तर गुडघेदुखी आणि इतर कुठल्याही हाडांच्या दुखण्यापासून दिलासा मिळू शकेल. स्ट्रेचिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, क्वाड्रिसेप्स, स्वाक्ट्स आणि हिल राइज यासारख्या व्यायामांमुळे गुडघ्यांचं आरोग्य सुधारायला मदत होेते आणि त्यांना चालना मिळाल्यामुळे पुन्हा एकदा नैसर्गिकरित्या वंगण तयार करण्याची प्रक्रिया सुरु होते. 

अधिक वाचा - Kidney damage Signal : तुमच्या लघवीचा रंगच सांगतो किडणीची खरी अवस्था, ओळखा आजाराची सुरुवात

नारळाचं पाणी

नारळाचं पाणी हा गुडघेदुखीवरचा दीर्घकालीन पण रामबाण उपाय मानला जातो. नारळपाण्यात असणाऱ्या अनेक घटकांमुळे गुडघेदुखी कमी होण्यास मदत होते. नारळपाण्यामुळे गुडघ्यांची लवचिकता वाढते. नारळपाण्यात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे हाडं आणि स्नायू बळकट व्हायला मदत होते. रोज एका नारळाचं पाणी नियमितपणे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

थोडक्यात चांगला आहार, पुरेसा व्यायाम आणि नारळपाण्याचं नियमित सेवन ही त्रिसुत्री वापरून गुडघेदुखी कमी करता येऊ शकते. गुडघेदुखी सुरु होण्यास अनेक कारणं असतात, त्यामुळे ती बरी व्हायलाही बराच काळ जावा लागतो. त्यामुळे हे घरगुती उपाय सुरू केल्यावर त्याचे परिणाम दिसायला काही काळ जाऊ शकतो. तोपर्यंत खंड पडू न देता हे उपाय करण्याचा सल्ला दिला जातो. गुडघेदुखीची समस्या उद्भवूनच नये, यासाठीदेखील हेच उपाय सांगितले जातात.

अधिक वाचा - Bath in Monsoon : पावसाळ्यात अंघोळीला नका मारू दांडी, होतील भयंकर दुष्परिणाम, वाचा सविस्तर

डिस्क्लेमर - गुडघेदुखीवरचे हे साधे आणि घरगुती उपाय आहेत. तुम्हाला गुडघेदुखीबाबत काही गंभीर समस्या असतील, तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी