Yoga for fertility | योगाचे अनेक फायदे आपल्याला माहित आहेत. मात्र प्रजनन क्षमता वाढवण्यासाठीदेखील योगाचा उपयोग होतो, हे अनेकांना माहित नसतं. आपली प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी अनेक जोडपी तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न करत असल्याचं आपण पाहतो. मात्र काही सोप्या घरगुती योगासनांनी प्रजनन क्षमता सुधारणं शक्य असल्याचं सिद्ध झालं आहे. अनेकदा तणावामुळे आणि हॉर्मोन्न्सचं संतुलन बिघडल्यामुळे प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम झाल्याचं दिसतं. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार योगासनांमुळे या समस्येवर उपचार होऊ शकतो. योगासने केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रित होतो आणि अंतर्गत ताणतणाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आरोग्यासोबतच प्रजनन क्षमतेवरही अनुकूल परिणाम दिसू लागतो.
दररोज योगासने केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे हार्मोनल बॅलन्सही योग्य राहतो. काही आसनं अशी आहेत ज्याचा फायदा प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी करता येऊ शकतो.
या योगासनासाठी पोटावर म्हणजेच पालथं झोपा. हात आपल्या छातीच्या रांगेत जमिनीवर टेकवा. श्वास बाहेर सोडत सोडत शरीराचा पुढचा भाग वर उचला. डोक्यापासून बेंबीपर्यंतचा भाग जमिनीपासून वर उचलून घ्या. हाताचे पंजे, पाय आणि हिप्स यांना जमिनीवरच दाबून धरण्याचा प्रयत्न करा. या अवस्थेत दहा ते पंधरा सेकंद थांबा आणि श्वास घेत राहा. त्यानंतर जमिनीवर झोपा. दररोज दहा ते पंधरा वेळ हे आसन करा. आसन करत असताना श्वासावर लक्ष केंद्रीत करा. त्यामुळे फुफ्फुसांची क्षमता सुधारते. पाठही मजबूत व्हायला मदत होते.
या आसनामुळे फेलोपियन ट्यूबचा भाग मोकळा व्हायला सुरुवात होते. हे आसन करण्यासाठी जमिनीवर झोपा, दोन्ही पाय भिंतीवर ठेवा. गुडघ्यांमध्ये 90 अशांचा कोन असू द्या. जोपर्यंत सहजरित्या या स्थितीत थांबता येईल, तेवढा वेळ थांबा. एका मिनिटाच्या आसनापासून या व्यायामाला सुरुवात करू शकता.
अधिक वाचा - Almonds Side Effects: जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त बदाम खात असाल तर वेळीच व्हा सावध, शरीराचे होईल हे नुकसान...
मांडी घालून बसा. आपल्या दोन्ही पायांना पकडून त्यांना शरीराकडे खेचा. कंबर सरळ ठेवा. हात पायावरच ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या. पेल्विक मसलला यामुळे आराम मिळतो आणि प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते.
गुडघ्यांवर बसा आणि डोकं जमिनीवर टेका. तुमच्या टाचा हिप्सना टच करु द्या. पुढच्या बाजूला स्ट्रेच करून तुमचे हात डोक्याच्या पुढे नेण्याचा प्रयत्न करा. श्वासांवर लक्ष केंद्रीत करा. यामुळे डोकं शांत राहतं आणि ओव्हरिज स्टिम्युलेट व्हायला मदत होते.