Lemon Benefits । असे करा एका लिंबाचे सेवन, पोटाशी संबंधित आजार होतील दूर

तब्येत पाणी
Updated Oct 12, 2021 | 16:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lemon Benefits । लिंबाचे आरोग्यास अनेक फायदे असतात. जाणून घ्या दिवसाला एक लिंबाचे सेवन केल्याने काय फायदे मिळतात. 

lemon
असे करा एका लिंबाचे सेवन, पोटाशी संबंधित आजार होतील दूर 
थोडं पण कामाचं
  • चवीने आंबट असलेले लिंबू पाचनसंस्था सुधारण्यास मदत करतात
  • आरोग्याशिवाय स्किनसाठीही लिंबू फायदेशीर आहे
  • हाय शुगर असलेल्यांसाठी लिंबू पाणी चांगला पर्याय आहे.

Lemon Benefits । मुंबई: लिंबू ही प्रत्येकाच्या घरात आढळणारी गोष्ट आहे. लिंबाच्या सेवनाने व्हिटामिन क ची कमतरता भरून निघते. आम्ही तुम्हाला आज लिंबाच्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत. लिंबू हे चवीला आंबट असते मात्र यास आरोग्यासाठीचे अनेक फायदे लपलेले असतात. लिंबाच्या सेवनाने शरीराची पाचनसंस्था मजबूत राहते. सोबतच लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतात. तसेच वजन घटवण्यासही मदत मिळते. (eat 1 lemon daily will help your health) 

आरोग्यासाठी लिंबाचे सेवन

आयुर्वेदात लिंबाचे एक महत्त्व आहे. यात अँटी इन्फ्लामेंट्री आणि अँटी मायक्रोबियल असे गुण असतात जे रक्त साफ करण्यासाठी तसेच अस्थमाच्या स्थितीमध्ये फायदेशीर ठरतात. 

लिंबामध्ये आढळणारी पोषकतत्वे

लिंबामध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिनबी ६, व्हिटामिनसी, व्हिटामिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आर्यन, फॉस्फरस, जस्त, फोलेट, तांबे, पँटोथेनिड अॅसिड, नियासिन थायमिन आणि अनेक प्रकारेचे प्रोटीन ही पोषकतत्वे असतात. 

लिंबाचे फायदे

चवीने आंबट असलेले लिंबू पाचनसंस्था सुधारण्यास मदत करतात. लिंबू पाण्याच्या सेवनाने शरीरातील एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतात आणि वजन घटवण्यासही मदत होते. 

पिंपल्सपासून सुटका

आरोग्याशिवाय स्किनसाठीही लिंबू फायदेशीर आहे. लिंबाच्या बिया अँटी बॅक्टेरियल असतात ज्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होण्यास मदत होते. 

वजन होते कमी

बेली फॅट आणि वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळा आणि प्या. यात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही एक चमचा मध मिसळू शकता. 

हाय शुगर असलेल्यांसाठी फायदेशीर

हाय शुगर असलेल्यांसाठी लिंबू पाणी चांगला पर्याय आहे. खासकरून जे डायबिटीजचे रुग्ण आहेत आणि त्यांना वजन कमी करायचे आहे अशांसाठी हा पर्याय चांगला आहे. 

पोटदुखी होते दूर

लिंबाच्या रसात आल्याचा रस आणि थोडीशी साखर मिसळल्याने पोटदुखीपासून सुटका मिळते. भाज्या आणि डाळींवर लिंबू पिळल्याने भाज्यांचा स्वाद अधिक वाढतो. यामुळे पदार्थ लवकर पचण्यास मदत होते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी