Curry Patta Khane Ke Fayde: भारतीय स्वयंपाकघरात कढीपत्ता मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. विशेषत: बहुतेक दक्षिण भारतीय पदार्थाची चव हे पानं वाढवत असतात. कढीपत्त्याच्या पानांनी कोणत्याही पदार्थाची चव सुधारली जाऊ शकते. बरेच लोक ते बाजारातून कढीपत्ता विकत घेत असतात तर काहीजण आपल्या घरा जवळच्या परसबागेत याचे झाड लावत असतात. दरम्यान आज आपण कढीपत्ताचे पान आपल्या आरोग्यासाठी कसे चांगले आहे, याची माहिती घेणार आहोत. कढीपत्ता हा आरोग्याचा खजिना आहे
कढीपत्त्यात फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, तांबे, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक आढळतात, जे शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. रोज सकाळी 3 ते 4 हिरवी पाने चघळल्यास त्याचा कसा फायदा होतो ते जाणून घेऊया...
कढीपत्ता खाल्ल्याने, रातांधळेपणा किंवा डोळ्यांशी संबंधित इतर अनेक रोगांचा धोका टळतो. कारण त्यात आवश्यक पोषक व्हिटॅमिन ए आढळते जे दृष्टी वाढवण्यास मदत करते.
मधुमेही रुग्णांना अनेकदा कढीपत्ता चावण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यात हायपोग्लायसेमिक गुणधर्म असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात.
कढीपत्ता रोज सकाळी रिकाम्या पोटी चावावा कारण यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, यासह पोटाच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळते.
कढीपत्त्यात अँटीफंगल आणि अँटीबायोटिक गुणधर्म आढळतात, ज्यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव होतो आणि रोगांचा धोका टळतो.
कढीपत्ता चघळल्याने वजन आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते कारण त्यात इथाइल एसीटेट, महानिम्बाइन आणि डायक्लोरोमेथेन सारखे पोषक घटक असतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया याचा अंमल करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. टाइम्स नाउ याची पुष्टी करत नाही.)