Weight Loss Tips : कढीपत्ता खा झटपट वजन कमी करा

Eat curry leaves to lose weight : इन्स्टंटच्या आजच्या जमान्यात वाढलेलं वजन पण अनेकांना झटपट आणि सहजतेने कमी करायचे असते. हे सोपे नाही. पण झटपट वजन कमी करण्यासाठी काही गोष्टी करणे शक्य आहे. यामुळे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. 

Eat curry leaves to lose weight
Weight Loss Tips : कढीपत्ता खा झटपट वजन कमी करा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Weight Loss Tips : कढीपत्ता खा झटपट वजन कमी करा
  • कढीपत्त्यात अनेक पोषक घटक
  • कढीपत्ता खाण्याचे फायदे

Eat curry leaves to lose weight : इन्स्टंटच्या आजच्या जमान्यात वाढलेलं वजन पण अनेकांना झटपट आणि सहजतेने कमी करायचे असते. हे सोपे नाही. पण झटपट वजन कमी करण्यासाठी काही गोष्टी करणे शक्य आहे. यामुळे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. 

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

कढीपत्ता आपण पदार्थ तयार करताना किंवा पदार्थांना फोडणी देताना अनेकदा वापरतो. यामुळे पदार्थ आणखी रूचकर होतो. हाच कढीपत्ता नियमित आणि मर्यादीत प्रमाणात खाल्ल्याने वजन कमी होण्यासविष्ट असतो. यामुळे नुसती कढीपत्त्याची पाने चावून खाल्ली तरी वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. स्मार्ट आणि फिट राहण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसा मदत होते. कढीपत्त्याला एक अनोखा वास येतो तसेच कढीपत्ता चठी कढीपत्ता हा एक उपयुक्त उपाय ठरू शकतो. 

कढीपत्त्यात अनेक पोषक घटक

कढीपत्त्यात शरीराला आवश्यक असे अनेक पोषक घटक आहेत. फायबर, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॉपर (तांबे), कर्बोदके असे वेगवेगळे पोषक घटक कढीपत्त्यात आहेत. या पोषक घटकांमुळे कढीपत्ता एक सुपरफूड झाले आहे. अतिरिक्त मेद अर्थात अतिरिक्त चरबी वितळवण्याच्या कामात कढीपत्ता मदत करतो. फॅट बर्न करणारा कढीपत्ता रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. कढीपत्ता खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही. उलट कढीपत्ता खाल्ल्याने वजन कमी होण्यास अथवा नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 

कढीपत्ता खाण्याचे इतर फायदे

कढीपत्ता वजन कमी करण्यासाठी मदत करतो. तसेच कढीपत्त्याचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. स्मरणशक्ती वाढण्यास तसेच अपुऱ्या रक्तामुळे होणारा अॅनिमियाचा त्रास कमी होण्यास मदत होते. कढीपत्त्यातील आयर्न अर्थात लोह आणि फॉलिक अॅसिड महिलांच्या आरोग्यासाठी लाभदायी आहे. कढीपत्ता अनेक प्रकारच्या संसर्गांपासून शरीराचे रक्षण करतो. पोटाचे विकार बरे करण्यास मदत करतो आणि पचनक्षमता सुधारतो. यामुळे दररोज मर्यादीत प्रमाणात कढीपत्ता चावून खा. 

असा करा कढीपत्त्याचा वापर

  1. कढीपत्त्याची किमान १५ पाने पाण्याने धुवा. नंतर ही पाने पिण्यायोग्य शुद्ध पाण्यात भिजवा आणि ते पाणी सहन होईल एवढे उकळवा. आता या पाण्यावर हवं असल्यास लिंबू पिळा नाही तर लिंबू न पिळता नुसतेच पाणी पिऊन घ्या. पाण्यातील कढीपत्त्याची पानं चावून खा.
  2. भाजी, वरण, आमटी तयार करताना त्यात कढीपत्त्याची पानं टाका
  3. भाजी, वरण, आमटी तयार करताना त्यात वापरलेली कढीपत्त्याची पाने चावून खा
  4. फोडणी करताना त्यात कढीपत्त्याची पानं वापरा पण फोडणीत तेल मर्यादीत प्रमाणात वापरा
  5. तुप वापरून फोडणी केली तरी हरकत नाही पण तुपाचे प्रमाण मर्यादीत ठेवा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी