Weight loss : वजन घटवण्यासाठी रात्रीच्या जेवणात घ्या डाळ-भात, जाणून घ्या याचे फायदे

तब्येत पाणी
Updated Mar 26, 2021 | 13:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

डाळ-भातामुळे पोट भरत नाही तर तुम्ही वजनही कंट्रोल करू शकता. जाणून घ्या डाएटमध्ये डाळ-भात खाण्याचे फायदे

daal-rice
वजन घटवण्यासाठी रात्रीच्या जेवणात घ्या डाळ-भात 

थोडं पण कामाचं

  • अनेकांना वाटते की भातामध्ये कार्बोहायड्रेट्स असात ज्याचे अधिक सेवन केल्याने वजन वाढू शकते.
  • डाळीमध्ये अनेक प्रकारचे प्रोटीन्स, व्हिटामिन्स आणि मिनरल्स असतात.
  • अनेकांना तुरीची डाळ पचवण्यास त्रास होतो त्यांनी डाळ बनवण्याआधी ती अर्धा तास भिजत घालावी.

मुंबई: प्रत्येकाच्या घरात डाळ-भात बनतोच. अनेकांना वाटते की डाळ भात खाल्ल्याने खास पोषण मिळत नाही जर तुम्हालाही असे वाटते तर  तुम्ही चुकीचा विचार करत आहात. आज आम्ही तुम्हाला या कॉम्बिनेशनच्या फायद्याबाबत सांगत आहोत. ज्यानंतर तुम्ही डाळ-भात बिनधास्त खाऊ शकता. 

वाढते वजन कमी करण्यासाठी अनेक लोक डाळ-भात खात नाहीत. मात्र रात्रीच्या जेवणात हेल्दी पदार्थ खातात. डाळ-भातामुळे केवळ पोटच भारत नाही तर तुमचे वजनही कंट्रोलमध्ये राहते. जाणून घ्या डाएटमध्ये डाळ-भात खाण्याचे काय आहेत फायदे

डाळ-भात खाल्ल्याने कमी होते वजन

अनेकांना वाटते की भातामध्ये कार्बोहायड्रेट्स असात ज्याचे अधिक सेवन केल्याने वजन वाढू शकते. मात्र जर तुम्ही कार्बोहायड्रेटचे सेवन करणे सोडून दिले जर तुमच्या शरीरात एनर्जीची मात्रा कमी होते. यासाठी रात्रीच्या वेळेस भात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. भातामध्ये अनेक प्रकारचे व्हिटामिन्स आणि मिनरल्स असतात. तुम्ही सफेद भाताऐवजी ब्राऊन राईस खाऊ शकता. 

अनेकांना तुरीची डाळ पचवण्यास त्रास होतो त्यांनी डाळ बनवण्याआधी ती अर्धा तास भिजत घालावी. याशिवाय डाळीला फोडणी देताना तुम्ही हिंगाचाही वापर करून शकता.

डाळीमध्ये असतात भरपूर प्रोटीन्स

डाळीमध्ये अनेक प्रकारचे प्रोटीन्स, व्हिटामिन्स आणि मिनरल्स असतात. तुम्ही डाळीमध्ये विविध भाज्या टाकून त्यांचे सांबारही बनवू शकता. .यामुळे तुमच्या आहारातील हेल्दी पदार्थांचा समावेशही वाढेल. तसेच तुमच्या आरोग्यासाठीही ते चांगले आहे. डाळ-भात हा खाण्यासाठी तसेच पचण्यासाठी सोपा आहे. आठवड्यातील चार दिवस डाळ-भात खाल्ल्याने वजन वाढत नाही. डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. डाळ-भातामध्ये फायबरचे प्रमाणही खूप असते ज्यामुळे पोटाच्या समस्या जाणवत नाहीत. 

डाळ खाण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्याने आपल्या शरीराला  लागणारे जवळपास सर्व घटक एकत्र मिळतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात. डाळीने आपल्या शरीराचे वजन वाढने थांबते आणि कफ आणि पित्तासारख्या समस्यांनाही दूर ठेवायला ती मदत करते. डाळीने रक्तातील सर्व विकार दूर होतात आणि त्यामुळे त्वचेच्या सर्व समस्यांपासून आपणास सुटका मिळते.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी