Egg : अंड्याचा हा भाग खाणे टाळा, नाहीतर जीवाला धोका

Eat egg for better health : अंडे हे एक सुपरफूड आहे असे अनेक डॉक्टर सांगतात. याच कारणामुळे जगभर अंड्यांना मोठी मागणी आहे. पण....

Eat egg for better health
अंड्याचा हा भाग खाणे टाळा, नाहीतर जीवाला धोका  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अंड्याचा हा भाग खाणे टाळा, नाहीतर जीवाला धोका
  • कर्करोग (कॅन्सर), कोलेस्टेरॉल, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा अशा स्वरुपाच्या समस्यांचा त्रास असल्यास अंडी खाणे टाळावे
  • भरपूर शारीरिक श्रम करून शरीर झिजवत नसाल तर आठवड्यातून जास्तीत जास्त 3 ते 5 अंडी खावी

Eat egg for better health : अंडे हे एक सुपरफूड आहे असे अनेक डॉक्टर सांगतात. याच कारणामुळे जगभर अंड्यांना मोठी मागणी आहे. अंडे चविष्ट असते. तसेच अंडे खाल्ल्याने शरीराला प्रोटिन्स आणि कॅल्शियम मिळते. अंड्यापासून अनेक रुचकर डिश झटपट तयार करणे सोपे आहे. यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना अंडे प्रिय आहे.

तज्ज्ञांच्या मते एका सामान्य अंड्यात 6.3 ग्रॅम प्रोटिन, 69 मिलीग्रॅम पोटॅशियम, 5.4 टक्के व्हिटॅमिन ए, 2.2 टक्के कॅल्शियम आणि 4.9 टक्के आयर्न असते. दररोज किमान एक अंडे खाल्ल्याने स्नायू आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. मेंदूची क्षमता वाढते. स्मरणशक्ती वाढते. रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. कर्करोगाचा (कॅन्सर) तसेच इतर अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. पण अंड्याचा एक भाग असा आहे जो खाण्याने शरीराला अपाय होऊ शकतो. यामुळे अंड्याचा हा भाग खाणे कायमचे टाळणे हिताचे.

ज्यांना आधीपासूनच कर्करोग (कॅन्सर), कोलेस्टेरॉल, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा अशा स्वरुपाच्या समस्यांचा त्रास आहे त्यांनी अंड्याचा आतील पिवळा भाग खाणे टाळावे, असे आहारतज्ज्ञ सांगतात. 

Eggs Shortage in Maharashtra : महाराष्ट्रात दररोज एक कोटी अंड्यांचा तुटवडा

Unhealthy food for kids: सावधान! मुलांना चुकूनही देऊ नका हे पदार्थ, पडेल महागात

पेरू खाणे पुरुष आणि गरोदर महिलांसाठी फायद्याचे

आपण दररोज भरपूर शारीरिक श्रम करून शरीर झिजवत नसाल तर आठवड्यातून जास्तीत जास्त 3 ते 5 अंडी खावी. अंड्यांचे मर्यादीत प्रमाणातले सेवन आरोग्यासाठी फायद्याचे आहे. पण अंडी खाण्याचा अतिरेक टाळावा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी