Fruit Weight Loss : मुंबई : फळं खाणे हे नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. बर्याच वेळेला कोणी आजरी असेल तर डॉक्टर रुग्णाला फळे खाण्याचा सल्ला देतात. फळांमुळे शरीराला जीवनसत्वेच नाही मिळत तर वजन कमी करण्यासही मदत होते. जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी कुठली फळे फायदेशीर ठरतात.
एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरला भेटण्याची गरज पडत नाही अशी इंग्रजीत म्हण आहे. या प्रमाणे खरचं सफरचंद खाल्ल्याने तब्येत चांगली राहते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. कारण सफरचंदमध्ये कॅलरी कमी असतात. सफरचंदात ११० कॅलरी असतात आणि यात भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात. सफरचंद खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल फार वाढत नाही.
बेरी हे फळ जितके लहान आहे तितकेच फायदेशीर. बेरीमुळे वजन कमी होण्यास मदत कमी होते कारण एका बेरीमध्ये केवळ ४२ कॅलरी असतात. तसेच बेरी खाल्ल्याने विटामिन सी आणि मॅगनीजही मिळतं.
किवी हे परदेशी फळ आहे ते हल्ली सर्रास भारतात पहायला मिळतं. चिकू सारख्या दिसणारे हे फळ खुप पौष्टिक असतं. ह फळ खाल्ल्याने नक्कीच वजन कमी होईल.
संत्र्यासारखे दिसणारे हे फळ एखाद्या द्राक्षाप्रमाणे झाडावर लगडलेलं असत. म्हणून या फळाला द्राक्षफळ म्हणतात. द्राक्षफळ खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.