Weight Loss: वजन घटवायचेय तर मधामध्ये मिसळा ही एक गोष्ट, होईल कमाल

तब्येत पाणी
Updated May 14, 2021 | 14:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

जर तुम्हालाही वजन घटवायचे आहे तर मधामध्ये एक गोष्ट मिसळून दररोज रिकाम्या पोटी खाल्ले पाहिजे. वेट लॉससोबत हे आरोग्यासाठीही चांगले आहे. 

weight loss
वजन घटवायचेय तर मधामध्ये मिसळा ही एक गोष्ट, होईल कमाल 

थोडं पण कामाचं

 • वजन घटवण्यासाठी मधामध्ये कच्ची लसूण मिसळा.
 • दररोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने वजन घटवणे असणार सोपे
 • चांगल्या आरोग्यासाठी रामबाण उपाय आहे मध आणि लसूण

मुंबई: लसूण आणि मध हे दोनही सर्वांच्याच किचनमध्ये आढळणारे पदार्थ आहेत. याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. आयुर्वेदातही दीर्घकाळापासून  लसूण आणि मधाचा वापर विविध आजारांवरील उपचारांसाठी केला जातो. मात्र तुम्ही विचार केला आहे का की कच्चा लसूण आणि मध एकत्र मिसळून खाल्ल्यास काय होईल. हे कॉम्बिनेशन तुम्हाला ऐकण्यासाठी विचित्र वाटेल मात्र वजन घटवण्यासोबतच आरोग्य चांगले राखण्यासाठी हा एक चांगला रामबाण उपाय आहे. 

वेट लॉससाठी कसे फायदेशीर आहे लसूण आणि मध

 1. कच्चा लसूणमध्ये मध मिसळून रिकाम्या पोटी खाल्ल्यास फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वेगाने होते ज्यामुळे वजन घटवण्यास(Fat burn) मदत मिळते. 
 2. लसूण व्हिटामिन बी६, व्हिटामिन सी, फायबर आणि मँगनीजन भरपूर प्रमाणात असते जे शरीरात जमा फॅटला कमी करण्यास मदत करते. 
 3. लसूण शरीरात जमा असलेल्या Toxins म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. यामुळे मेटाबॉलिज्मची प्रक्रिया वेगाने होते. तसेच इम्युनिटीही मजबूत होते. 
 4. दुसरीकडे मधाबाबत बोलायचे झाल्यास मध फॅट फ्री आणि कोलेस्ट्रॉल फ्री असते आणि सतत लागणाऱ्या भुकेला कंट्रोल करण्याचे काम मध करते. 
 5. जर सकाळी रिकाम्या पोटी मधाचे सेवन केल्यास दिवसभर काम करण्याची उर्जा मिलते. तसेच फॅटला मेटाबोलाईज करण्यातही मदत होते. 

वजन घटवण्यासाठी मध आणि लसणाचे करा असे सेवन

लसणाच्या १-२ पाकळ्या घ्या आणि त्या सोलून घ्या आणि चांगले कुटून घ्या. यात एक चमचा मध मिसळा आणि नीट मिकस् करा. १५-२० मिनिटे हे मिश्रण असेच राहू द्या. त्यानंतर रिकाम्या पोटी या मिश्रणाचे सेवन करा.  (Eat empty stomach).तुम्हाला हवे असल्यास तुम्ही जास्तीचे मिश्रण बनवून फ्रिजमध्ये ठेवून तीन दिवसांपर्यंत खाऊ शकता. एका दिवसांत लसणाच्या दोन पाकळ्यांपेक्षा जास्त खाऊ नका नाहीतर तोंड आणि पोटात जळजळ होऊ शकते. 

लसूण आणि मधाचे इतर फायदे

 1. वजन घटवण्याशिवाय लसूण आणि मधाचे मिश्रण खाल्ल्याने प्रतिकारक्षमता वाढते(Immunity boost). तसेच आजारांशी लढण्यास मदत मिळते. 
 2. सर्दी, तापाची समस्या असल्यास त्यात लसूण आणि मधाचे मिश्रण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
 3. पाचनशक्ती सुधारण्यासाठीही लसूण आणि मधाचा फायदा होतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी