Weight Loss: वाढत्या वजनाने आहात त्रस्त तर डाएटमध्ये सामील करा लसूण-मध

तब्येत पाणी
Updated May 12, 2022 | 11:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight Loss Tips:लसूण आणि मधाच्या सेवनाने वजन कमी करण्यात मदत होऊ शकते. 

weight loss
वाढत्या वजनाने आहात त्रस्त तर डाएटमध्ये सामील करा लसूण-मध 
थोडं पण कामाचं
  • लसूण आणि मधाचे फूड कॉम्बिनेशन आरोग्यासाठी चांगले मानले जाते. 
  • याच्या सेवनाने पाचन शक्ती तंदुरूस्त राहण्यास मदत होते. 

मुंबई: आजकाल बरेच लोक वाढत्या वजनाने(weight gain) त्रस्त आहेत. लोक वजन कमी करण्यासाठी विविध पद्धती वापरतात. काही लोक दररोज रिकाम्या पोटी कोमट पाणी पितात. तर काही डाएटिंग करतात. काहीजण तर जेवणच कमी करतात. मात्र त्यानंतरही फार कमी लोक वजन कमी करण्यात अयशस्वी ठरतात. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर तुम्हालाही आता त्रस्त होण्याची गरज नाही कारण आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय(home remedies) सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही वजन कमी(weight loss) करू शकता. eat garlic and honey for weight loss

अधिक वाचा - मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील एसी लोकल वाढणार

यावरील फायदेशीर उपाय म्हणजे मध आणि कच्चा लसूण. दोन्हीचे कॉम्बिनेश वेट लॉससाठी फायदेशीर ठरते. जाणून घेऊया लसूण आणि मध कशा पद्धतीने वजन कमी करण्यात मदत करते. 

लसूण आणि मधाचे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी चांगले मानले जाते. याच्या सेवनाने पाचनशक्ती तंदुरुस्त राहते. जर तुमची पाचनशक्ती चांगली असेल तर वजनही वेगाने कमी होईल. वजन कमी करण्यासाठी मध आणि लसूण बेस्ट उपायांपैकी एक आहे. यात असे तत्व असतात जे वजन घटवण्यात फायदेशीर ठरतात. याच्या सेवनाने लवकर भूकही लागत नाही. लसूण आणि मधामुळे केवळ वजन कमीच होत नाही तर इम्युनिटीही स्ट्रांग होते. 

वजन कमी करण्यासाठी असे करा सेवन

  1. सगळ्यात आधी लसणाच्या काही पाकळ्या घ्या आणि त्याची साले काढा.
  2. यानंतर मध घ्या. 
  3. एका जारमध्ये लसूण टाका. 
  4. त्यानंतर यावर मध टाका. 
  5. जेव्हा मध आणि लसूण नीट एकत्रित होईल तेव्हा जार टाईट करून बंद करा. 
  6. यानंतर यातील एक लसूण दररोज रिकाम्या पोटी सकाळी सेवन करा.
  7. असे केल्याने वजन कमी होऊ शकते. 
  8. दरम्यान, दररोज केवळ एकच लसूण खा त्यापेक्षा जास्त नको. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी