Garlic Benefits: नवी दिल्ली : आरोग्यासंदर्भात ऋतूमान खूप महत्त्वाचे असते. कारण हवामानाचा आपल्या शरीरावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे ऋतू बदलल्यावर आहारावर विशेष लक्ष दिले पाहिजे. आता हिवाळा सुरू झाला आहे. थंडीच्या दिवसात आरोग्याकडे (Health)खास लक्ष देण्याची आवश्यकता असते. एरवी हिवाळ्याचा ऋतू (Winter) आरोग्यवर्धक मानला जात असला तरी याच काळात आरोग्याच्या अनेक समस्यादेखील निर्माण होत असतात. खास करून ताप, सर्दी, पडसे, खोकला यासारख्या समस्या उद्भवतात. याचा संबंध रोगप्रतिकार क्षमतेशी असतो. म्हणूनच व्यायाम आणि आहारावर (Diet) लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. रोगप्रतिकाशसक्ती (Immunity) वाढवणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत. लसूण (Garlic) हा असाच एक बहुगुणी पदार्थ आहे. लसणाचा प्रभाव उष्ण असतो. त्यामुळे तो थंडीमध्ये फायद्याचा असतो. याशिवाय लसणामध्ये (Benefits of Garlic) जीवनसत्त्वे, खनिजे तसेच सेलेनियम, जर्मेनियम आणि अमिनो अॅसिडही यामध्ये असतात. हे एक नैसर्गिक प्रतिजैविक आहे. ज्याचा उपयोग हिवाळ्यामध्ये संक्रमणास प्रतिबंध करण्यासाठी होतो. त्यातील B1, B6 आणि C जीवनसत्त्वे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात. लसूण ब्राँकायटिस आणि न्यूमोनियावरदेखील फायदेशीर असतो. लसणाच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया. (Eat garlic like this in winter to get rid off many diseases read in Marathi)
अधिक वाचा - जीवनात नव्याने भरतील रंग, या Relationship Tips ने वैवाहिक आयुष्यात होईल दंग
सर्दी-खोकल्यावर गुणकारी
हिवाळा म्हटला की सर्दी, ताप, पडसे, घसा खवखवणे, खोकला येणे या समस्या वारंवार उद्भवतात. यावर मात करण्यासाठी तुम्ही रोज एक लसूण खाण्यास सुरूवात करा. लसूण खाताना तो तुपात भाजून खाल्ल्याने सर्दी-खोकल्यावर मोठा आराम पडतो. शिवाय लसणामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात ते तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात.
अधिक वाचा - Honeymoon Tips: हनीमूनला गेल्यावर चुकूनही करू नका 'या' 8 चुका, अन्यथा मजा ठरेल सजा
रक्तदाब नियंत्रण
अलीकडच्या काळात प्रत्येक घरात उच्च रक्तदाबाची समस्या आढळते. यासाठी रुग्णांनी लसणाचे सेवन केल्यावर त्याचा मोठा फायदा होतो असे तज्ज्ञांचे मत आहे. यामध्ये असलेले एलिसिन रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राखते. कच्च्या लसणाच्या पाकळ्या रिकाम्या पोटी खाल्ल्याने खूपच फायदा होतो.
पचनसंस्था मजबूत करा
पचनक्रिया मजबूत करण्यासाठी रिकाम्या पोटी लसणाच्या पाकळ्या खाव्यात. यामुळे आतड्यातील चांगले बॅक्टेरिया वाढवतात. त्याचा फायदा होत पचनक्रिया सुधारते.
अधिक वाचा - Buttons on pocket: जीन्सच्या पॉकेटवर का असतात छोटी छोटी बटनं? कारण वाचून पडाल विचारात
कोलेस्ट्रॉल नियंत्रण
कोलेस्ट्रॉल वाढणे ही सध्या अनेकांना जाणवणारी समस्या आहे. त्यातच हिवाळा म्हटला की तळलेले पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते. तळलेल्या पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. यातून मग इतर अनेक व्याधी लागतात. रोज सकाळी एक कच्चा लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवता येते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिल्यास हार्ट अटॅक आणि पक्षाघाताची समस्या उद्भवत नाही.
(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)