Weight Loss Tips । मुंबई :आजच्या धावपळीच्या जगात जीवनशैली आणि आहार असा झाला आहे की वजन वाढणे अगदी सामान्य आहे. मात्र वाढत्या वजनासोबत शरीराला इतर समस्यांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज आहे. यावर प्रभावी उपाय म्हणून तुम्ही आहारात लिंबासोबत गुळाचे सेवन करू शकता. लिंबाचे रोज सेवन केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात, तसेच वजन कमी होण्यासही मदत होते. (Eat lemon with jaggery to lose weight, know everything).
अधिक वाचा : पवारांनीही भूमिका बदलल्या - मुनगंटीवार
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, तर याचे गुळासोबत सेवन केल्यास ते खूप फायदेशीर ठरते. या दोन्हींचे एकत्र सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. लक्षणीय बाब म्हणजे यांचे एकत्र सेवन केल्याने अस्वास्थकर चरबी कमी होते, तसेच ते पोटात साठलेली चरबी काढून टाकण्यात खूप प्रभावी आहेत. जर तुम्ही जास्त प्रमाणात कोलेस्टेरॉलच्या समस्येने त्रस्त असाल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी घ्या, त्यात एक चमचा लिंबू मिसळा त्यानंतर त्यात गुळ मिसळून त्याचे सेवन करा. ते आपल्याला दीर्घ कालावधीसाठी हायड्रेट ठेवण्यास मदत करतात, मात्र वजन जलद गतीने कमी करण्यासाठी देखील ते उपयुक्त आहे.
अधिक वाचा : ओळख करत शिक्षकाने शिक्षिकेवर केला बलात्कार
गुळामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते, त्याच्या रोजच्या सेवनाने शरीर हायड्रेट राहते आमि चयापचय क्रियेमध्ये वाढ होते. गुळामध्ये पॉलीफेनॉल अँटीऑक्सिडंट असते, जे वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे. तसेच ते एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करते आणि एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते.
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. ते अँटी-ऑक्सिडंट्स, झिंक आणि सेलेनियममध्ये समृद्ध आहेत, तसेच ते रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवतात. लिंबाच्या रोजच्या सेवनाने शरीरात साचलेली विषारी द्रव्ये सहजरित्या बाहेर पडतात. तर लिंबूच्या नियमित सेवनाने श्वसन आणि पचनसंस्थेची स्वच्छताही चांगली होते.