वजन कमी करायचंय? मग सकाळी ‘या’ वेळेआधी करा जेवण

तब्येत पाणी
Updated May 26, 2019 | 21:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

वाढलेलं वजन कमी करणं म्हणजे एक मोठा टास्क असतो. आपल्या खाण्या-पिण्यासोबतच व्यायामाच्या वेळा पाळणंही गरजेचं असतं. याच बाबतीत आणखी एक रिसर्च समोर आलाय. त्यानुसार लंच कधीपर्यंत करायचं याची मर्यादा सांगण्यात आलीय.

weight loss tips
वजन कमी करण्यासाठी ही वेळ पाळा  |  फोटो सौजन्य: Getty Images

Weight Loss : आपलं वजन कमी करण्यासाठी लोकं अनेक प्रकारचे प्रयत्न करतात. अधिकाधिक फायबर, लो फॅट आणि कार्ब्सचं संतुलन सांभाळत वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. काही जण खूप शारीरिक मेहनत करतात, जिममध्ये खूप घाम गळतात. तर काही जण डाएट आणि व्यायाम दोन्ही खूप चांगल्या पद्धतीनं करतात. मात्र तरीही वजन कमी करण्याचं त्यांचं लक्ष्य साध्य होत नाही. यामागे अनेक कारणं आहेत.

वेळेवर न्याहारी न करणं किंवा न्याहारी न करता सरळ दुपारचं जेवण घेणं. स्वत:ला उपाशी ठेवण्याची सवय लावल्यानंही वजन कमी होत नाही. उलट असं काही केल्यानं वजन कमी करण्याच्या आपल्या इतर प्रयत्नांवर पाणी फेरलं जातं. मात्र नुकतंच एका रिचर्सनुसार काही माहिती समोर आलीय. हा रिसर्च दुपारच्या जेवणाबाबतचा आहे.

जाणून घ्या काय सांगितलंय या रिसर्चमध्ये

जेवणाबाबत एका स्टडीमधून नवीन खुलासा केला गेलाय. यात दुपारच्या जेवणाबद्दल एक मुख्य गोष्ट सांगितली गेलीय. या रिसर्चमध्ये सांगितलंय की, दुपारचं जेवण जर ४ वाजेनंतर केलं गेलं तर त्याचा उलट परिणाम समोर येतो. म्हणून लंच नेहमी दुपारी ३ पूर्वी करणं आवश्यक आहे. जर तुम्ही दुपारी ३ नंतर जेवत असाल, तर कुठल्याही प्रकारचा योगा, डाएट, व्यायाम केला तरीही आपलं वजन कमी होणार नाही. रिसर्चमध्ये बघितलं गेलंय जे लोक काम जास्त आहे म्हणून आपली जेवणाची वेळ टाळतात आणि दुपारी ३ नंतर जेवतात त्यांचं वजन कमी होण्याऐवजी वाढतं.

काय सांगतो हा रिसर्च

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या अभ्यासानुसार दुपारी ३ नंतर जेवणाऱ्यांचं वजन खूप कमी प्रमाणात घटतं. स्पेनमध्ये १२०० लोकांवर हा रिसर्च केला गेला. या १२०० जणांनी रिसर्चदरम्यान नेहमी दुपारी ३ नंतर जेवण केलं आणि वजन कमी करण्यासाठी सर्व प्रकारचे व्यायाम आणि डाएट केले. तरीही त्यांचं वजन कमी झालं नाही. तर जे लोकं दुपारी १ ते २ च्या दरम्यान जेवत असे, त्यांचं वजन कमी झालं होतं.

नोट: प्रस्तुत लेखात सुचवण्यात आलेल्या टिप्स अथवा उपाय ही केवळ साधी माहिती आहे. कोणतेही उपाय करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा तसेच हेअर स्पेशालिस्टचा सल्ला जरूर घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
वजन कमी करायचंय? मग सकाळी ‘या’ वेळेआधी करा जेवण Description: वाढलेलं वजन कमी करणं म्हणजे एक मोठा टास्क असतो. आपल्या खाण्या-पिण्यासोबतच व्यायामाच्या वेळा पाळणंही गरजेचं असतं. याच बाबतीत आणखी एक रिसर्च समोर आलाय. त्यानुसार लंच कधीपर्यंत करायचं याची मर्यादा सांगण्यात आलीय.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola