Eat Lychee For Weight Loss, Eat Lychee Reduce Weight : उन्हाळ्याच्या दिवसांत आंबा या फळाव्यतिरिक्त लिची हे फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. नियमित लिची खाल्ल्याने आरोग्याला अनेक लाभ होतात. लिची हे फळ चविष्ट आहे. लिची वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे.
तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराचा दाह कमी करण्याचे काम लिची हे फळ करते. नियमित मर्यादीत लिची खाल्ल्याने त्वचा तजेलदार होते. लिची हे फळ पचनक्षमता सुधारण्यासाठीही उपयुक्त आहे. खाल्लेले पदार्थ पचविण्यासाठी जेवणानंतर मर्यादीत प्रमाणात लिची खातात. लिची या फळात फायबर, अँटीऑक्सिडंट्स आहेत. यामुळे लिची खाल्ल्यास शरीरातील अपायकारक घटक शरीराबाहेर फेकण्याची प्रक्रिया वेगाने होते. पाणीदार फळ असल्यामुळे लिची शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करते.
गोड, पाणीदार लिची शरीरातील अनेक प्रकारचे संसर्ग (इन्फेक्शन) बरे करण्यास मदत करते. सर्दी, खोकला, ताप या समस्या नियमित मर्यादीत प्रमाणात लिची खाल्ल्याने बऱ्या होण्यास मदत होते. लिची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी मदत करते.
लिची हृदयाची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते. यामुळे हृदयविकाराचा त्रास असलेल्यांना लिची खाण्यास सांगितले जाते. लिची या फळात पोटॅशियम आहे जे हृदयासाठी लाभदायी आहे.