matki : सेक्स पॉवर वाढविणारे आणि आरोग्यासाठी संजीवनी असलेले कडधान्य

मटकीची मुळे मादक असतात. ताप आला असेल तर मटकी पथ्यकर आहे. मटकी हे कडधान्य कामोत्तेजक (सेक्स पॉवर वाढविणारे)  पित्तविकाररोधक (अॅसिडिटीचा त्रास कमी करणारे) पाचक आणि हृदयाची क्षमता वाढविणारे कडधान्य आहे.

eat matki for healthy life,eat moth bean for healthy life
सेक्स पॉवर वाढविणारे आणि आरोग्यासाठी संजीवनी असलेले कडधान्य 
थोडं पण कामाचं
 • सेक्स पॉवर वाढविणारे आणि आरोग्यासाठी संजीवनी असलेले कडधान्य
 • मटकी खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे
 • कोणता आजार झाला तर मटकी खाऊ नये

उत्तम आरोग्यासाठी ताजे आणि सकस अन्न खावे. भरपूर हिरव्या भाज्या आणि ताजी फळे खावी असे आपण अनेकदा ऐकतो. वर्षानुवर्षे हाच सल्ला ऐकून आपण ताज्या भाज्या खाण्याला प्राधान्य देत आहोत. पण दररोज भाज्या आणणे आणि करणे याचाही काही वेळा कंटाळा येतो तर काही वेळा कामाच्या व्यापात ते शक्य होत नाही. यामुळेच अनेक महिला अधूनमधून भाजी ऐवजी कडधान्ये करणे पसंत करतात. शक्यतो पावसाळ्यात पचायला जड म्हणून कडधान्ये कमी खाल्ली जातात. पण भारतात झटपट स्वयंपाक करण्यासाठी काही वेळा मटकीची भाजी केली जाते.

अनेकजण मिसळ हा चटपटीत पदार्थ तयार करण्यासाठीही मटकी या कडधान्याचा वापर करतात. अनेकांच्या आवडत्या कडधान्यांमध्ये मटकीचा समावेश असतो. पण या मटकीचा वापर फक्त भाजी किंवा उसळ तयार करण्यापुरताच मर्यादीत नाही. मटकी खाण्याचे मानवी आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळेचे अधूनमधून मर्यादीत प्रमाणात मटकी खाणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे. 

मटकीची मुळे मादक असतात. ताप आला असेल तर मटकी पथ्यकर आहे. मटकी हे कडधान्य कामोत्तेजक (सेक्स पॉवर वाढविणारे)  पित्तविकाररोधक (अॅसिडिटीचा त्रास कमी करणारे) पाचक आणि हृदयाची क्षमता वाढविणारे कडधान्य आहे. सुश्रुतसंहितेत मटकीचा उल्लेख ‘वनमुग्द’ या नावाने आला आहे.

मटकी खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे

 1. सकाळी नाश्त्यात मर्यादीत मटकी खाल्ल्याने मलावरोधाची समस्या दूर होण्यास मदत होते.
 2. मटकी खाल्ल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
 3. सर्दी, पडसे, कफ या विकारांत मटकीच्या उकळलेल्या पाण्याचा उपयोग लाभदायी.
 4. मधुमेह असलेल्यांनी मर्यादीत प्रमाणात नाश्ता म्हणून मोड आलेली मटकी खाणे हिताचे.
 5. मटकीतील पोटॅशिअम रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत सुरू राहील याची खबरदारी घेते. रक्तदाब नियंत्रणात ठेवते.
 6. मटकी हे कडधान्य आयर्न अर्थात लोहाचे मोठे स्रोत आहे. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण आणि रक्ताची गुणवत्ता वाढविण्यासाठी तसेच शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी दररोज सकाळी नाश्ता करतेवेळी मर्यादीत प्रमाणात मोड आलेली मटकी खावी. अॅनिमियाचा त्रास कमी करण्यासाठी मटकी हा उत्तम उपाय.
 7. मटकी या कडधान्यातील झिंक रोगप्रतिकारक क्षमता वाढविते.
 8. लक्षात ठेवा वातविकार, अजीर्ण, अपचन, उदरवात, पोटदुखी, मूळव्याध, आतड्यााची सूज यापैकी एखादा त्रास असल्यास मटकी खाऊ नये. आजारी असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे.

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी