Weight loss tips: वजन घटवण्यासाठी गहू नव्हे तर ओट्सची चपाती खा, काही दिवसांतच दिसेल फरक

तब्येत पाणी
Updated Oct 29, 2020 | 18:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight loss tips: ओट्सपासून बनवलेल्या चपात्या या गहूच्या चपातींच्या तुलनेत अधिक स्वादिष्ट आणि पौष्टिक असतात. वजन घटवण्यासाठी या फायदेशीर ठरतात. 

oats
वजन घटवण्यासाठी गहू नव्हे तर ओट्सची चपाती खा, घटेल वजन 

थोडं पण कामाचं

  • गव्हाच्या पिठामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात
  • मधुमेह असलेल्यांसाठी ओट्सची चपाती चांगली असते
  • जर तुम्ही वेट लॉस जर्नीवर आहात तर तुमच्या प्लेटमध्ये ओट्सच्या पिठापासून बनवलेल्या चपातीचा समावेश करा. 

मुंबई: बऱ्याच भारतीय घरांमध्ये गहूपासून बनवलेली चपाती सर्वाधिक बनवली आणि खाल्ली जाते. मात्र जर तुम्ही वजन कमी करत आहात आणि ही चपाती खात आहात तर तुमचे वजन तितकेसे कमी होणार आहे. गव्हाच्या पिठामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे जर तुम्ही वेट लॉस जर्नीवर आहात तर तुमच्या प्लेटमध्ये ओट्सच्या पिठापासून बनवलेल्या चपातीचा समावेश करा. 

ओट्स चपाती एक हेल्दी आणि ग्लुटेन फ्री रेसिपी आहे जी गव्हापेक्षाही अधिक पौष्टिक आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे पीठ १०० टक्के शुद्ध आहे. ओट्सपासून बनवलेल्या चपात्या ज्यांना थायरॉईड. पीसीओएस, मधुमेह आणि हृदयरोगासारख्या समस्या आहेत त्यांच्यासाठी वरदान आहे. जर तुम्ही वजन कमी करत आहात तर ओट्सपासून बनवलेल्या चपात्या खा. 

  1. ओट्सच्या चपातीमध्ये फार कमी प्रमाणात कॅलरीज असतात त्यामुळे वेट लॉससाठी ही फायदेशीर असते. 
  2. मधुमेह असलेल्यांसाठी ओट्सची चपाती चांगली असते ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही
  3. ओट्समध्ये प्रोटीन आणि फायबर असते जे हृदयरोग असणाऱ्यांसाठी चांगले आहे.. 

अशी बनवा ओट्सची चपाती 

चपाती बनवण्यासाठी सुरूवातीला ओट्स मिक्सरमध्ये चांगले बारीक वाटून घ्या. त्यानंतर हे पीठ नीट चाळून घ्या. एका भाड्यांत एक कप गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यावर गॅस बंद करा. आता एका भांड्यांत एक कप पीठ काढा आणि त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल टाका. यात गरम पाणी टाका आणि पीठ चांगले मळून घ्या. पीठ मळल्यानंतर १० मिनिटे तसेच ठेवा. या पीठापासून चपात्या बनवा. ही चपाती तुम्ही तूप लावून आवडत्या भाजीसोबत खा. ओट्सची चपाती तुम्ही ताजे दही, पनीर अथवा चिकन वा प्रोटीन रिच भाजीसोबत खाऊ शकता. 

दरम्यान, केवळ चांगले डाएट घेऊन वजन कमी होणार नाही तर डाएटसोबत नियमित एक्सरसाईजही वजन घटवण्यासाठी तितकीच गरजेची आहे. त्यामुळे ओट्स चपाती खाण्यासोबत दररोज ३० मिनिटे व्यायाम जरूर करा. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी