Health Tips : सकाळी उठल्याबरोबर घरातील या 3 वनस्पतींची पाने खा, रक्तातील साखर आणि बीपी वाढण्याचे टेन्शन दूर होईल.

तब्येत पाणी
Updated Apr 29, 2022 | 00:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

How to lower Blood Sugar and Blood Pressure: रक्तातील साखर आणि उच्च रक्तदाब या दोन्ही गंभीर समस्या आहेत. त्यांच्यावर नियंत्रण न ठेवल्यास तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. अनेक आयुर्वेदिक वनस्पती मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी सिद्ध होऊ शकतात.

Eat the leaves of these 3 plants in the house, rising blood sugar and BP will be in Control
या औषधी वनस्पतींची पाने खाणे फायदेशीर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • या 3 औषधी वनस्पतींची पाने खाणे आरोग्यासाठी फायदेशीर
  • रक्तातील साखर आणि बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त
  • निरोगी आहार आणि जीवनशैली शरीरासाठी उपयुक्त

How to lower Blood Sugar and Blood Pressure: रक्तातील साखर आणि उच्च रक्तदाब या दोन्ही गंभीर समस्या आहेत. त्यांच्यावर नियंत्रण न ठेवल्यास तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. अनेक आयुर्वेदिक वनस्पती मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी सिद्ध होऊ शकतात.


डायबिटीज (Diabetes) हा एक गंभीर आणि असाध्य रोग आहे जो केवळ निरोगी आहार आणि सक्रिय जीवनशैलीद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. 
या आजारात स्वादुपिंड रक्तातील साखर नियंत्रित करणाऱ्या इन्सुलिन संप्रेरकाचे उत्पादन कमी करते किंवा थांबवते. अशा स्थितीत रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते, त्यामुळे अनेक गंभीर समस्यांचा धोका असतो. त्यामुळेच रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब ही देखील एक सामान्य समस्या बनली आहे. यावर नियंत्रण न ठेवल्यास तुम्हाला हृदयविकाराचा धोका असू शकतो. 
रक्तदाब नियंत्रणाबाहेर गेल्याने अंधुक दृष्टी, थकवा, डोकेदुखी, नाकातून रक्त येणे, श्वास घेण्यात अडचण येणे इत्यादी  अनेक लक्षणं दिसू शकतात. 


अर्थात, रक्तदाब आणि रक्तातील साखरेसाठी अनेक औषधे आणि उपचार आहेत, परंतु काही नैसर्गिक उपायांद्वारे तुम्ही मधुमेह आणि उच्च रक्तदाब सारख्या गंभीर समस्यांवरही मात करू शकता. घरामध्ये आढळणाऱ्या काही झाडांच्या पानांमध्ये रक्तातील साखर आणि बीपी नियंत्रित ठेवण्याची क्षमता असते. कसे ते जाणून घेऊया-

कढीपत्ता : 


कढीपत्ता फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर त्यात अनेक आरोग्य गुणधर्मही आहेत.गोड कडुलिंबाच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या या वनस्पतीच्या पानांमुळे पचनशक्ती मजबूत होते आणि पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी या पानांचे सेवन अवश्य करावे.कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींना उत्तेजित करण्यास मदत होते. या पेशी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

कडुनिंब

कडुलिंबाच्या पानांचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. दररोज कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते याचा पुरावा आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर कडुलिंबाची पाने तुमचा सोबती आहे. कडुनिंबाच्या पानांच्या अँटीहिस्टामाइन प्रभावामुळे रक्तवाहिन्या पसरू शकतात. यामुळेच ही पाने रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. कडुलिंबाचा अर्क किंवा कॅप्सूल महिनाभर घेतल्यानेही उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते.


तुळशीची पाने

तुळशीला औषधी वनस्पतींची राणी म्हटले जाते आणि ती शरीराला अनेक रोगांपासून वाचवते. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी होते. तुळशीची पाने लिपिड्स कमी करून, इस्केमिया, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब कमी करून हृदयरोग रोखण्यासाठी उपयुक्त आहेत. तुळशीची पाने चघळणे हा बीपी आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्याचा उत्तम मार्ग आहे. थोड्या प्रमाणात मिळण्यासाठी तुम्ही ही पाने मिक्सरमध्ये मिसळून देखील पिऊ शकता. लक्षात ठेवा तुळशीच्या पानांचे जास्त प्रमाणात सेवन करू नये.

( Disclaimer: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. 
अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी