थंडीत खा हे 5 पदार्थ आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवा

eat these 5 foods during cold days and boost immunity, eat 5 superfood for health benefits before going to sleep : थंडीत इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारकक्षमता वाढविण्यासाठी खा 5 पदार्थ

eat these 5 foods during cold days and boost immunity
थंडीत खा हे 5 पदार्थ आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • थंडीत खा हे 5 पदार्थ आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवा
  • कमी रोगप्रतिकारक क्षमता असलेले थंडीत आजारी पडण्याचा धोका जास्त
  • रोगप्रतिकारक क्षमता वाढवून तब्येत जपणे

eat these 5 foods during cold days and boost immunity, eat 5 superfood for health benefits before going to sleep : थंडीचे आगमन झाले आहे. गारठा वाढल्यामुळे वातावरण एकदम सुखद झाले आहे. पण या बदलेल्या वातावरणामुळे काही जणांना त्रास होण्याचा आणि त्यांची तब्येत खालावण्याचा धोका आहे. प्रामुख्याने कमी रोगप्रतिकारक क्षमता असलेली मुलं, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांची तब्येत थंडीच्या दिवसांत ढासळण्याचा धोका असतो. यावर एका सोपा उपाय आहे. रोगप्रतिकारक क्षमता अर्थात रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे. 

थंडीत इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारकक्षमता वाढविण्यासाठी खा 5 पदार्थ

  1. गूळ : गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न (लोह), व्हिटॅमिन्स (जीवनसत्वं), कॉपर हे पोषक घटक असतात. गुळ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. अॅनिमियाच्या रुग्णांनी दररोज मर्यादीत गुळ खाणे फायद्याचे. दमा, टीबी, शरीरात रक्ताची कमतरता असणे, रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे यापैकी कोणत्याही समस्येने त्रस्त असल्यास दररोज मर्यादीत गुळ खा फायदा होईल.
  2. पेठा : पेठ्यात विविध खनिजे, व्हिटॅमिन्स, आयर्न, सल्फर, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटिन हे पोषक घटक मर्यादीत प्रमाणात असतात. पेठा खाल्ल्याने पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास बरा होण्यास मदत होते. पेठा रक्त शुद्ध करतो. मूत्रदोष, पोटातील जळजळ यावर पेठा उपयुक्त आहे.
  3. दूध : दररोज रात्री झोपताना तसेच सकाळी नाश्ता करण्याच्यावेळी किमान एक ग्लास गरम दूध प्या. दुधातून शरीराला प्रोटिन्स, कॅल्शियम, आयोडिन, वेगवेगळ्या प्रकारची व्हिटॅमिन्स हे पोषक घटक मिळतील. दुधामुळे स्नायू बळकट होण्यास मदत होईल. एक ग्लास दुधात एक चमचा हळद मिसळून ते दूध प्यायल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मोठी मदत होईल.
  4. बदाम : थंडीच्या दिवसांत रात्री भिजवून सकाळी किमान 5 बदाम व्यवस्थित चावून खा.  तसेच रात्री झोपण्याआधी 5 बदाम व्यवस्थित चावून खा. बदाम खाल्ल्यानंतर एक ग्लास दूध पिणे जास्त हिताचे आहे. बदाम खाणे, दूध पिणे यामुळे थंडीत रात्री शांत झोप लागते. बदाम खाल्ल्याने शरीराला हेल्दी फॅट्स, अमीनो अॅसिड, मॅग्नेशिअम असे पोषक घटक मिळतात. केस, त्वचा यांच्यासाठी बदाम खाणे लाभदायी आहे. बदाम खाऊन नंतर झोप घेतली तर अमीन अॅसिड त्वचा आणि केस यांची निगा राखण्यासाठी नैसर्गिकरित्या जास्त प्रमाणात वापरले जाते. 
  5. केळं : दररोज रात्री झोपण्याआधी आणि सकाळी नाश्ता करण्याच्यावेळी किमान 2 ते 3 केळी खाणे लाभदायी आहे. केळ्यांमध्ये कार्बोहायड्रेट असतात. ही कार्बोहायड्रेट शरीरात ट्रिप्टोफेन तयार करण्यासाठी लाभदायी आहेत. रात्री केळी खाऊन नंतर झोपल्यास शांत झोप लागते तर नाश्ता करण्याच्यावेळी केळी खाल्ल्याने दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळवण्यास मदत होते. केळ्यांमध्ये मॅग्नेशिअम आणि फायबर हे दोन पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे केळे शरीरातील स्नायू बळकट करणे तसेच पचनक्षमता सुधारणे या दोन्हीसाठी फायद्याचे ठरते.

Weight Loss Tips: जेवणानंतर 15 मिनिटं करा हे आसन, लोण्यासारखी वितळेल पोटाची चरबी

Excessive Thirst: वारंवार पाणी पिऊनही तुमची तहान भागत नसेल तर असू शकतात हे आजार...

महाराष्ट्रात पुढील 10-12 दिवस थंडी जाणवणार

महाराष्ट्रात पुढील 10-12 दिवस थंडी जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ईशान्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचे आगमन झाले आहे. विदर्भात काही ठिकाणी शीतलहर अर्थात तीव्र थंडीचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे किमान तापमान 10 ते 12 अंश से. तर राज्याच्या उर्वरित भागांमध्ये किमान तापमान 14 ते 16 अंश से. राहील असा प्राथमिक अंदाज आहे. थंडीची तीव्रता 27 नोव्हेंबर 2022 पासून महाराष्ट्रात जाणवू लागेल, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण विभागात सोमवारी आणि मंगळवारी कमाल तापमान ३३ ते ३३.५ अंश से. राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात 28 ते 29 अंश से. कमाल तापमान असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी