Weight Loss Tips in Marathi : वजन कमी करताना खा हे पाच पदार्थ, ओवर इटिंगपासून मिळेल सुटका

वजन कमी करण्यासाठी लोक काय करतात. काही लोक व्यायाम करतात तर काही लोक स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतात. जे लोक खवय्ये असतात त्यांना स्ट्रिक्ट डाएट फॉलो करणे फार कठीण जातं. कारण त्यांना दर दोन तासांनी खाण्याची सवय असते. असे केल्याने वजन वाढतंच तसेच केलेल्या व्यायाम आणि मेहनत वाया जाते.

weight loss
वजन कमी करण्याच्या टिप्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यासाठी लोक काय करतात. काही लोक व्यायाम करतात तर काही लोक स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतात.
  • जे लोक खवय्ये असतात त्यांना स्ट्रिक्ट डाएट फॉलो करणे फार कठीण जातं.
  • कारण त्यांना दर दोन तासांनी खाण्याची सवय असते.

Weight Loss Tips in Marathi : वजन कमी करण्यासाठी लोक काय करतात. काही लोक व्यायाम करतात तर काही लोक स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतात. जे लोक खवय्ये असतात त्यांना स्ट्रिक्ट डाएट फॉलो करणे फार कठीण जातं. कारण त्यांना दर दोन तासांनी खाण्याची सवय असते. असे केल्याने वजन वाढतंच तसेच केलेल्या व्यायाम आणि मेहनत वाया जाते. जर तुम्हाला सारखी सारखी भूक लागत असेल तर तुम्ही प्रोटीन आणि फायबर असलेले पदार्थ खात नसला. तुम्ही पौष्टिक आहार घेत नसल्याने तुम्हाला सातत्याने भूक लागत असेल. जाणून घेऊया असे पदार्थ जे खाल्ल्यामुळे तुमचे पोट भरलेले राहील आणि त्यामुळे तुमचे वजनही वाढणार नाही.  (eat these five food while weight loss journey and avoid over eating read in marahti)


बदाम

जर तुम्हाला सारखी भूक लागत असेल तर मध्ये मध्ये बदाम खा, बदामध्ये विटामिन ई, मॅग्नेशिय, अँटीऑक्सिडेंट्स, हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि फायबर असतं. प्रोटीन आणि फायबर असलेले पदार्थ खाल्ल्यास फार वेळ भूक लागत नाही. 

मोड आलेले चणे 

खूप भूक लागली असेल तर मोड आलेले चणे खावेत. चण्यामुळे शरीराला फायबर आणि प्रोटीन मिळतं. त्यामुळे खूप वेळ भूक लागत नाही. प्रोटीन पचायला शरीराला वेळ लागतो. चण्यामुळे भूकेचे हार्मोन कमी होतात. चण्यामध्ये विटामीन बी असतं. सकाळी नाष्ट्याला हे चणे खाल्ल्यास दिवसभर फार भूक लागत नाही. 

ताक

जर दुपारी किंवा रात्री जेवल्यानंतर हलकी भूक लागली असेल तर तुम्ही ताक पिऊ शकता. दहीपासून बनलेल्या ताकात प्रोबायोटिक असतं. त्यामध्ये योग्य प्रमाणात व्हे प्रोटीन असतं. ताक प्यायल्याने शरीर हायड्रेट राहतं तसेच पोटाची भूकही शमते. काही लोक अन्न पचवण्यासाठी ताक पितात. ताकात कॅल्शियम आणि प्रोटीन असल्याने फार वेळ भूक लागत नाही.  

नारळाचे खोब्र

भूक लागल्यास तुम्ही नारळाचे खोब्रही खाऊ शकतात. खोब्र खाल्ल्यामुळे शरीरातील फॅटही कमी होतं. नारळात हाय फायबरं असत. खोब्र खाल्ल्यामुळे फार वेळ भूक लागत नाही आणि त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. 


भाज्यांचा रस

खुप भूक लागल्यावर तुम्ही भाज्यांचा रस पिऊ शकता. हा रस आणखी हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही जवसही घालू शकता. भाज्यांच्या रसात अँटीऑक्सिडेंट आणि फायबर असतं. हा रस प्यायल्यानंतर लगेच भूक लागत नाही. तसेच भाज्यांच्या रसामुळे पचनशक्ती चांगली होते आणि शरीरही स्वस्थ होतं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी