Winter Health Tips: हिवाळ्यात या गोष्टींचा करा आहारात समावेश...व्हाल तंदुरुस्त आणि फिट

Health Tips : हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी आणि आजारपणं टाळण्यासाठी आहार-विहाराची काळजी घेणे आवश्यक असते. खास करून हिवाळ्यात बाजारात खाद्यपदार्थ आणि हिरव्या भाज्यांचा पुरवठा वाढतो. याबरोबर अनेक प्रकारची फळे आणि फुलेही बाजारात येऊ लागतात. एकीकडे तब्बेत कमावण्यासाठी हिवाळा हा ऋतु उत्तम असतो.

Health Tips for winter
हिवाळ्यासाठी हेल्थ टिप्स 
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात आजारपणं वाढतात
  • हिवाळ्यात आहारासाठीच्या टिप्स
  • हे अन्न खाल्ल्याने वाढते रोगप्रतिकारक्षमता

Healthy Food for Winter : नवी दिल्ली : ऋतु बदलला की त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. आता हिवाळा (Winter)सुरू झाला आहे. हिवाळ्यात तंदुरुस्त (Health) राहण्यासाठी आणि आजारपणं टाळण्यासाठी आहार-विहाराची काळजी घेणे आवश्यक असते. खास करून हिवाळ्यात बाजारात खाद्यपदार्थ आणि हिरव्या भाज्यांचा पुरवठा वाढतो. याबरोबर अनेक प्रकारची फळे आणि फुलेही बाजारात येऊ लागतात. एकीकडे तब्बेत कमावण्यासाठी हिवाळा (Health in winter)हा ऋतु उत्तम असतो. मात्र त्याचबरोबर फारशी काळजी न घेतल्याने या काळात अनेकजण आजारी पडतात. त्यामुळे आजारपणं टाळण्यासाठी तुम्ही स्वतःची काळजी घेणे आणि काही आवश्यक गोष्टींचा आहारात समावेश करणे महत्वाचे आहे. परिणामी रोग प्रतिकारक्षमता (Immunity) वाढून तुम्ही अधिक निरोगी राहाल. (Eat these food in winter to improve immunity)

अधिक वाचा : म्हणून लहान मुले रात्रीचे जागतात

हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी काय खावे -

हिरवा भाजीपाला

हिवाळा हा असा ऋतू आहे ज्या काळात विविध प्रकारच्या भाज्या बाजारात उपलब्ध असतात. एरवीदेखील हिरवा भाजीपाला आरोग्यदायी असतोच. मात्र हिवाळ्यात निरोगी राहण्यासाटी तुम्ही हिरव्या भाज्यांचे प्रमाण आहारात वाढवले पाहिजे. यात पालक, मोहरीच्या हिरव्या भाज्या, कोबी, मेथी यासारख्या भाज्यांचे सेवन करणे तुमच्यासाठी फायद्याचे असते. 

ग्रीन टी 

थंडी म्हटली की गरम चहा पिण्याचा आनंद सर्वचजण घेतात. नेहमीच्या चहाऐवजी ग्रीन टी पिणे तुमच्यासाठी अधिक फायद्याचे ठरेल. ग्रीन टीमध्ये असणारे अॅंटी ऑक्डिडंट गुणधर्म तुमची रोग प्रतिकारक्षमता वाढवतात.

अधिक वाचा - थंडीत खा हे 5 पदार्थ आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवा

फळे खा

थंडीच्या मोसमात तुम्ही तुमच्या आहारात संत्रा, टेंजेरिन, द्राक्षे इत्यादी फळांचा समावेश करू शकता. कारण या फळांमध्ये व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात.

अधिक वाचा - Winter best destination: आपल्या जोडीदारासह करा बर्फाळ डोंगदरऱ्यांची सैर...सौंदर्याचा खजिना, सोबत जबरदस्त ऑफर्सदेखील

ड्राय फ्रुट्स किंवा सुकामेवा

सुकामेवा प्रत्येकालाच आवडतो. हिवाळ्यात तर तुम्ही आवर्जून याचा रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. बदाम, मनुका, काजू, अक्रोड, मनुका यासारख्या सुक्यामेव्यात अनेक पोषक घटक असतात, ज्यांचा उपयोग तुम्हाला तंदुरुस्ती वाढवण्यासाठी होतो. ड्राय फ्रुट्समध्ये व्हिटॅमिन, मॅग्नेशियम, फायबर, ओमेगा 3, अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे तुमची शारीरिक क्षमता वाढते.

याचबरोबर योग्य जीवनशैलीची जोड दिल्यास चांगले फायदे दिसून येतात. हिवाळ्यात व्यायाम करण्यासाठी अतिशय योग्य परिस्थिती असते. त्यामुळे सकाळी व्यायाम करणे, योग्य आहार घेणे इत्यादी बाबींवर लक्ष दिल्यास यंदाचा हिवाळा तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरू शकतो. बाहेरील खाद्यपदार्थ टाळले पाहिजेत. हिवाळ्यात अनेक संसर्ग पसरतात त्यापासून सावध राहिले पाहिजे. थंड पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी