Millets or Millet : कॅल्शिअम, आयर्न, प्रोटिन्ससाठी खा हे पदार्थ

Eat these foods for calcium, iron, proteins : तृणधान्य खाल्ल्याने शरीराला कॅल्शिअम, आयर्न (लोह), प्रोटिन्स (प्रथिने) मिळतात. रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. याच कारणासाठी तृणधान्य खावे.

Eat these foods for calcium, iron, proteins
कॅल्शिअम, आयर्न, प्रोटिन्ससाठी खा हे पदार्थ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कॅल्शिअम, आयर्न, प्रोटिन्ससाठी खा हे पदार्थ
  • महाराष्ट्र शासनाचे आवाहन
  • हे पदार्थ खा आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवा

Eat these foods for calcium, iron, proteins : सध्या महाराष्ट्रासह भारतात एच१एन१ आणि एच३एन२ या दोन प्रकारच्या इन्फ्ल्यूएन्झा या संसर्गजन्य आजाराची साथ पसरत आहे. या अशा वातावरणात रोगप्रतिकारक क्षमता वाढणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. तृणधान्य तसेच लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करणे; पुरेशी झोप घेणे आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता पण तेवढीच महत्त्वाची आहे. नागरिकांनी ही काळजी घ्यावी. तसेच बरे वाटत नसेल, सर्दी, ताप, खोकला झाला असेल तर लगेच जवळच्या सरकारी किंवा खासगी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावे; असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

कॅल्शिअम, आयर्न, प्रोटिन्ससाठी खा तृणधान्य

तृणधान्य खाल्ल्याने शरीराला कॅल्शिअम, आयर्न (लोह), प्रोटिन्स (प्रथिने) मिळतात. रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. याच कारणासाठी तृणधान्य खावे. कमी ग्लायसेमिक इंडेक्स, मुख्य आहाराच्या तुलनेत जास्त फायबर देणारे धान्य यामुळे तृणधान्य लवकर पचते. तृणधान्य खाल्ल्याने भूक लागल्यावर खाल्लेले इतर पदार्थ पचविण्यास मदत होते. 

तृणधान्य खाण्याचा मोठा फायदा

कोविड, एच१एन१ आणि एच३एन२ या दोन प्रकारचे इन्फ्ल्यूएन्झा, स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजारांसह मधुमेह (डायबीटीस), रक्तदाबाची समस्या (ब्लडप्रेशर किंवा बीपी), लठ्ठपणा आदी अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी तृणधान्ये अर्थात भरडधान्ये (मिलेट / Millets or Millet) खाणे लाभदायी आहे. तृणधान्ये अर्थात भरडधान्ये (मिलेट / Millets or Millet) खाण्याने शरीराला अनेक पोषक घटक मिळतात तसेच शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. वाजवी दरात उपलब्ध असलेली तृणधान्ये अर्थात भरडधान्ये (मिलेट / Millets or Millet) खाणे शरीरासाठी अतिशय फायद्याचे आहे.

जाणून घ्या कोणते तृणधान्य खाल्ल्याने शरीराला नेमके काय फायदे होतात?

  1. ज्वारी : ज्वारीत असलेल्या न्यूट्रास्युटिकल गुणधर्मामुळे बरेचसे आजार बरे करण्यास मदत होते. ज्वारीतील तंतूमय पदार्थ (फायबर) आणि स्टार्चमुळे रक्तातील कोलोस्ट्रॉल, हृदयविकार, आतड्याचे आजार, बद्धकोष्ठता नष्ट होते.
  2. बाजरी : बाजरीत सल्फरयुक्त अमीनो अॅसिड असल्याने लहान मुले आणि गर्भवतींसाठी बाजरी अतिशय उपयुक्त आहे. बाजरीमध्ये लोहाचे अर्थात आयर्नचे प्रमाण गहू  मका, भात, ज्वारी या पिकांपेक्षा जास्त आहे. यामुळे आहारात बाजरीचा समावेश केल्यास शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
  3. नाचणी : नाचणी मध्ये तंतुमय पदार्थ (फायबर) असल्यामुळे नाचणीचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे नाचणी मधुमेही व्यक्तींसाठी खूप उपयोगी ठरते, ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखर एकदम वाढू देत नाही. यामध्ये पोटॅशियम आणि ‘ब ‘ जीवनसत्व (व्हिटॅमिन बी) भरपूर प्रमाणात आहे.
  4. भगर : भगरमध्ये कर्बोदके, कॅल्शिअम, फॉस्फरस आहे. तसेच प्रथिने (प्रोटिन्स) व स्निग्ध हे उच्च प्रतीचे असल्यामुळे आरोग्यास अत्यंत उपयुक्त आहे.
  5. राजगिरा : राजगिराची पाने, धान्य या दोन्हीचाही आहारात उपयोग केला जातो. यात कॅल्शिअम आणि लोहचे (आयर्न) प्रमाण भरपूर असते. ग्लुटेन फ्री असल्यामुळे गव्हाची अॅलर्जी असणाऱ्या व्यक्तींसाठी राजगिरा हा  उत्तम पर्याय आहे.

तृणधान्ये अर्थात भरडधान्ये (मिलेट) मानवी शरीराला लागणारे पोषक घटक पुरवतात म्हणून त्यांना सुपरफूड म्हटले जाते. या पिकांचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शुष्क प्रदेशात किंवा कोरडवाहू प्रदेशातही भरडधान्यांची लागवड शक्य आहे.

मिलेटची पौष्टिकता उत्कृष्ट आहे. त्यात प्रथिने (प्रोटिन्स), तंतूमय पदार्थ (फायबर), खनिज पदार्थ (मिनरल्स), जीवनसत्वे (व्हिटॅमिन्स) मुबलक प्रमाणात असतात. ती सावकाश व हळुवारपणे पचविली जातात. सहज पचण्याच्या गुणधर्मामुळे मधुमेह (डायबीटीस) व लठ्ठपणा हे विकार असणाऱ्या लोकांना त्यांचा चांगला उपयोग होऊ शकतो. ज्वारी, बाजरीबरोबरच राळा, नाचणी,  वरी असे भरडधान्याचे विविध प्रकार आढळतात. त्यात ग्लुटेन नसते व तंतूमय घटक, प्रथिने चांगली असतात. रक्तशर्करा व कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी ते उपयुक्त आहेत. या गुणांमुळेच लोक पुन्हा भरडधान्याकडे वळू लागले आहेत. चांगल्या  आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्यांना अन्नाचा पर्याय बनविणे काळाची गरज आहे.

उन्हाळ्यात या भाज्या खाणे आरोग्यासाठी फायद्याचे

कोविडची लस H3N2 वर किती प्रभावी?

पांढरा कांदा खाण्याचे फायदे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी