Health Tips: मासिक पाळीच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी खा या गोष्टी, लवकर पडेल आराम

Health Tips: अनेक महिला मासिक पाळीदरम्यान कोणतीही औषधे घेत नाहीत. याऐवजी शेक देणे आणि घरगुती उपचार करण्यास त्या प्राधान्य देतात. जर यावेळी आपल्याला होणाऱ्या वेदना तीव्र असतील तर या गोष्टी खाऊन आराम मिळवू शकता.

Periods
मासिक पाळीच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी खा या गोष्टी, लवकर पडेल आराम  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • जास्तीत जास्त पाणी प्या
  • अॅव्होकॅडो आणि भोपळ्याच्या बियाही असतात लाभदायक
  • हिरव्या भाज्यांचे करा सेवन

मासिक पाळी (Menstrual cycle) हा महिलांच्या आयुष्याचा (women’s life) भाग आहे जो दर महिन्याला येतो. यादरम्यान महिलांना पोटात दुखणे (stomach pain), चिडचिड (irritability) होणे, डोकेदुखी (headache) इत्यादी समस्यांमधून महिलांना जावे लागते. या वेदना सामान्यतः सौम्य असतात. पण काही महिलांना मात्र तीव्र वेदना (strong pains) आणि गोळे येण्याचा (cramps) त्रास होतो. यादरम्यान त्यांच्या कामावर (work) आणि दैनंदिन आयुष्यावरही (daily routine) परिणाम होतो. अनेक महिला मासिक पाळीदरम्यान कोणतीही औषधे (medicines) घेत नाहीत. याऐवजी शेक देणे आणि घरगुती उपचार (home remedies) करण्यास त्या प्राधान्य देतात. जर यावेळी आपल्याला होणाऱ्या वेदना तीव्र असतील तर या गोष्टी खाऊन आपण आराम मिळवू शकता.

जास्तीत जास्त पाणी प्या

पाणी प्यायल्याने शरीरात ओलावा राहतो. ब्लोटिंगपासून सुटका मिळवण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे जास्तीत जास्त पाणी पिणे. याशिवाय चहा किंवा कॉफी घेणेही यासाठी फायदेशीर असते.

हिरव्या भाज्यांचे करा सेवन

रक्ताच्या कमतरतेमुळे शरीरात लोहाची मात्रा कमी होते ज्यामुळे आपल्याला सुस्ती येते. जेवणात केळी, हिरव्या पानभाज्या आणि पालक खा. या गोष्टींमध्ये जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. या गोष्टी लोहाचा मुख्य स्रोत असतात.

अॅव्होकॅडो आणि भोपळ्याच्या बियाही असतात लाभदायक

मासिक पाळीदरम्यान मॅग्नेशियमचे भरपूर सेवन करावे. आपल्या आहारात अॅव्होकॅडो, भोपळ्याच्या बिया आणि शिजवलेल्या बीन्सचे सेवन करा. यामुळे पोटदुखी आणि डोकेदुखीपासून सुटका मिळते.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटची चव आपल्याला आवडत नसेलही, पण यात मॅग्नेशियन, पोटॅशियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे मांसपेशींना आराम मिळतो. तसेच वेदनाही कमी होतात. यात सेरोटोनिन नामक रसायन असते ज्यामुळे मासिक पाळीदरम्यान आपण शांत राहाल.

दालचिनी

वेदना आणि सूज कमी करण्यासाठी आहारात किंवा सलाडमध्ये दालचिनीचा वापर करा. एक कप गरम दुधात दालचिनी घालून पिणे हे अधिक फायदेशीर असते.

आले आणि बडीशेप

जेवणानंतर बडीशेप चावून चावून खाल्ल्याने पचन सुधारते आणि प्रोस्टाग्लँडीनच्या वेदना कमी करण्यासाठी मदत करते. याशिवाय आलेही अतिशय फायदेशीर असते कारण यात इन्फ्लेमेटरी गुण असतात जे मासिक पाळीदरम्यान वेदना कमी करतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी