मुंबई: थंडीमध्ये(winter season) गोड(sweets) खाण्याची इच्छा वाढते. गोड पदार्थांचे अधिक सेवन आरोग्यास(health) हानिकारक मानले जाते. अधिक प्रमाणात गोड खाल्ल्याने डायबिटीज, हृदयाशी संबंधित आजार, लठ्ठपणा यासारखे आजार वाढतात. जर तुम्हीही गोड पदार्थांचे शौकीन असाल आणि थंडीच्या दिवसांत तुम्हाला गोड पदार्थ खावेसे वाटत असतील तर आम्ही तुम्हाला अशा दोन गोष्टी सांगत आहोत ज्या तुम्ही चवीने खाऊ शकता आणि तुमच्या आरोग्याचेही नुकसान होते. Eat this 2 sweets in winter will increase your immunity power
तुम्हाला थंडीत गुळाचे सेवन केले पाहिजे. अनेक अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आर्यन, व्हिटामिन्स, कॉपरसारखी पोषकतत्वे असतात. याच कारणामुळे गुळाचे सेवन केल्याने अॅनिमियासारख्या आजारांपासून सुटका होते. तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर गुळाचे सेवन केले पाहिजे. थंडीच्या दिवसांत प्रदूषणाचा त्रास वाढू लागतो. यामुळे अस्थमा आणि टीबीसारखे श्वास आणि फुफ्फुसांचे आजार वाढू लागतात. अशातच गुळाचे सेवन फायदेशीर ठरते. यात अँटी अॅलर्जिक गुण असतात.
गूळ आणि लोणी एकत्र खाल्ल्याने श्वासासंबंधीचे आजार दूर होतात. गरम पाण्यासोबत गूळ खाल्ल्याने पोटाचे त्रास दूर होतात. सोबतच इम्युनिटी सिस्टीमही मजबूत होते.
पेठ्यामध्ये खनिज, व्हिटामिन, आर्यन, कॅल्शियम, सल्फर, फॉस्फरस आणि प्रोटीन चांगल्या प्रमाणात आढळते. तसेच पाचनशक्ती वाढवण्यासाठी, बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी, ताकद मिळवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पेठा खाणे चांगले मानले जाते. पेठा खाण्यास केवळ स्वादिष्टच नसतो तर आरोग्यासाठीही चांगला मानला जातो. पेठा खाल्ल्याने शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते. वजन वाढण्यापासून रोखणे अथवा रक्तातील अशुद्धी दूर करण्याचे काम पेठा करते. पेठा शरीरातील दोष जसे मूत्राशयाची समस्या आणि पोटाची जळजळ थांबवण्याचे काम करते. ज्यांना सतत भूक लागण्याचा आजार आहे त्यांनी पेठाचे सेवन करावे.
ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास आहे त्यांनी त्यांच्यासाठी पेठा हे एक वरदानच आहे. पेठा खाल्ल्याने फुफ्फुसांना आराम मिळतो. दम्याच्या आजारांपासून सुटका मिळते. शरीर लवचिक रहावे असे वाटत असेल तर दररोज पेठा खा. यामुळे शरीरास ताकद मिळते.