Weight loss: रात्री झोपण्याआधी करा या ३ गोष्टींचे सेवन, गायब होईल पोटाची चरबी

तब्येत पाणी
Updated May 09, 2022 | 12:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight loss tips:जर तुम्हीही वाढत्या वजनाने त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे..

weight loss
झोपण्याआधी करा या ३ गोष्टींचे सेवन, गायब होईल पोटाची चरबी 
थोडं पण कामाचं
  • पोटाची चरबी कमी करण्यासाठी पुदीना फायदेशीर ठरतो.
  • दालचिनी साधारणपणे चयापचय वाढवणाऱ्या गुणांसाठी ओळखली जाते.
  • वजन कमी करण्यासाठी रात्री झोपण्याआधी हळदीचे दूध प्या. हे

मुंबई: अनेक लोकांसाठी आपले वाढलेले वजन(weight loss) कमी करणे हे सगळ्यात मोठे आव्हान असते. वजन कमी करण्यासाठी अनेकजण नानाविध प्रयत्न करत असतात. असे असतानाही त्यांचे वजन मात्र कमी होत नाही. अशातच तीन अशा गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. पुदीना(pudina), दालचिनी(cinamon) आणि हळदीच्या दुधाच्या(turmeric milk) सेवनाने तुम्ही वजन घटवू शकता. जाणून घ्या यांचे सेवन कसे करावे...eat this 3 things before sleep for weight loss

अधिक वाचा - पाकिस्तानमुळे चीन मोठ्या अडचणीत! आता या गोष्टीची भीती

पोटाची चरबी वाढण्याचे कारण

  1. बराच वेळ एकाच जागेवर बसून काम करणे
  2. जेवल्यानंतर लगेचच झोपी जाणे
  3. कमी झोप घेणे आणि तळलेले, भाजलेले पदार्थ खाणे. 
  4. दारू पिणे तसेच धूम्रपान केल्यानेही पोटाची चरबी वाढते. 

वजन घटवण्यासाठी झोपण्याआधी या ३ गोष्टींचे सेवन करा

पुदीना 

पोटाची चरबी कमी करण्यासाठी पुदीना फायदेशीर ठरतो. तुम्ही दररोज पुदिन्याचे सेवन करू शकता. याशिवाय पुदिना चहाही पिऊ शकता अथवा पुदिन्याची चटणी वा रायताबी बनवू शकता. याशिवाय रात्रीच्या वेळेस काही इतर गोष्टींचे सेवन करूनही तुम्ही लठ्ठपणाची समस्या कमी करू शकता.

दालचिनी

दालचिनी साधारणपणे चयापचय वाढवणाऱ्या गुणांसाठी ओळखली जाते. यात अँटी ऑक्सिडंट आणि अँटी बायोटिक गुण असतात ज्यामुळे एक डिटॉक्स ड्रिंक बनते. यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते आणि वजनही कमी होते. झोपण्याच्या आधी दालचिनी चहा प्यायल्यास वजन कमी करण्यास मदत होते.

अधिक वाचा - Asani Cyclone: 'असानी' चक्रीवादळ पुढील 24 तासात तीव्र

हळद आणि दूध

वजन कमी करण्यासाठी रात्री झोपण्याआधी हळदीचे दूध प्या. हे वजन घटवण्यासाठी आणि पाचन सुधारण्यास मदत होते. हळदीमध्ये अँटी ऑक्सिडंट गुण असतात जे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. यात कॅल्शियम आणि प्रोटीनही असते जे चांगली झोप आणि वजन घटवण्यासाठी प्रोत्साहन देतात. 

Disclaimer:

येथे देण्यात आलेली माहिती केवळ सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे. यातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी