Weight Loss: भूक शांत करण्यासाठी डाएटमध्ये समाविष्ट करा या ५ गोष्टी

तब्येत पाणी
Updated Mar 31, 2021 | 14:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

जर भूक शांत करण्यासाठी तुम्ही काही अनहेल्दी गोष्टी खात आहात तर आजच ही सवय सोडा. याऐवजी तुम्ही हेल्दी पदार्थांचे सेवन करू शकता. यामुळे वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होईल. 

food
eat this 5 healthy food for weight loss 

थोडं पण कामाचं

  • जर तुम्हीही भूक शांत करण्यासाठी अनहेल्दी पदार्थ खात आहात तर ही सवय आजच सोडा.
  • तुम्ही याऐवजी हेल्दी पदार्थांचे सेवन करू शकता. हे हेल्दी पदार्थ तुमचे वजनही नियंत्रणात राखण्यास मदत करतील.
  • मूठभर बदाम तुमची भूक शांत करण्याचे काम करू शकते.

मुंबई: अनेकजण आपले वाढते वजन(weight loss) कमी करण्यासाठी कॅलरी(calories) मेंटेन करत डाएटचे(diet) प्लानिंग करतात. दरम्यान दुपारी जेवणाच्या आधी आणि त्यानंतर खूप जोरात भूक लागते. यादरम्यान, अनेकजण भूक शांत करण्यासाठी अनहेल्दी फूडचे सेवन करतात. याच कारणामुळे वजन वाढण्यास मदत होते. याशिवाय स्नॅक्स खाल्ल्यानंतरही तुम्हाला पुन्हा भूक लागते. याचे कारण म्हणजे असे अनहेल्दी  खाल्ल्याने तुमची भूक काही काळापुरती शांत होते मात्र पूर्ण होत नाही. असे केल्याने फक्त तुमच्या कॅलरीज वाढतात आणि वजन वाढते. 

जर तुम्हीही भूक शांत करण्यासाठी अनहेल्दी पदार्थ खात आहात तर ही सवय आजच सोडा. तुम्ही याऐवजी हेल्दी पदार्थांचे सेवन करू शकता. हे हेल्दी पदार्थ तुमचे वजनही नियंत्रणात राखण्यास मदत करतील. जाणून घ्या या ५ पदार्थांबद्दल जे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करू शकता. 

बदाम 

मूठभर बदाम तुमची भूक शांत करण्याचे काम करू शकते. बदाममध्ये व्हिटामिन ई, मॅग्नेशियम, अँटी ऑक्सिडंट आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे भूक शांत होण्यास मदत होते. दररोज बदामचे सेवन आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. सोबतच भूकही शांत होते. 

डार्क चॉकलेट

कोण म्हणतं चॉकलेट खाणे फायदेशीर नसते. तुम्ही साध्या चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेटचे सेवन करू शकता. डार्क चॉकलेटमध्ये ७० टक्के कोको असते. यामुळे भूक बराच काळ शांत राहण्यास मदत होते. यात स्टरिक अॅसिड असते जे पाचनक्रिया धीमी करण्यास मदत करते. यामुळे बराच काळ भूक लागत नाही. 

दालचिनी

सगळ्यांच्या घरातील मसाल्यांमध्ये आढळणारा पदार्थ म्हणजे दालचिनी. दालचिनीमुळे जेवणाचा स्वाद वाढतो यासोबतच शुगर लेव्हल कंट्रोल होण्यास मदत होते. २००७च्या स्टडीनुसार दररोज ६ ग्रॅम दालचिी खाल्ल्याने पाचनक्रिया धीमी होते आणि यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. तुम्ही दालचिनी ओटमील्स, स्मूदी अथवा हर्बल चहामध्ये मिक्स करून सेवन करू शकता. 

मेथी

मेथीचा वापर जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी केला जातो. आयुर्वेदात अनेक आजारांविरुद्ध लढण्यासाठी मेथी फायदेशीर आहे. यात ४५ टक्के फायबर असते ज्यामुळे पाचनतंत्र मजबूत होण्यास मदत होते. भारतीय जेवणात मेथीचा वापर स्वाद वाढवण्यासाठी केलाजातो. वज कमी करण्यासाठी एक चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात टाकून प्या. तुम्ही हे मेथीचे दाणे चावूनही खाऊ शकता. 

आले

आल्याचा वापर हजारो वर्षांपासून विविध प्रकारच्या आरोग्याशी संबधित आजारांवरील उपचारासाठी केला जात आहे. आल्यामध्ये पाचनशक्ती असते. ज्यामुळे भूक दीर्घकाळ शांत राहते. २०१२च्या स्टडीनुसार जे लोक नाश्त्यामध्ये आल्याचे सेवन करतात त्यांना तीन तास भूक लागत नाही. तुम्ही सकाळची चहा अथवा हर्बल टीमध्ये आल्याचा वापर करू शकता. याशिवाय याचे अनेक फायदेही आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी