Weight loss: मॉर्निंग वॉकनंतर लगेचच खा हे पदार्थ, लठ्ठपणा काही दिवसांत होईल गायब

तब्येत पाणी
Updated Jun 14, 2022 | 16:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

food for weight loss: मॉर्निंग वॉक करणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मॉर्निंग वॉकनंतर कोणत्या गोष्टीचे सेवन करावे. 

morning walk
मॉर्निंग वॉकनंतर लगेचच खा हे पदार्थ, लठ्ठपणा होईल गायब 
थोडं पण कामाचं
  • मॉर्निंग वॉक केल्याने तणाव(stress) आणि डिप्रेशन कमी होण्यास मदत होते.
  • यामुळे वजनही(weight) नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • मॉर्निंग वॉक केल्याने अनेक गंभीर आजारापासून तुमचा बचाव होऊ शकतो.

मुंबई: मॉर्निंक वॉक(morning walk) करणे हे शरीरास अत्यंत फायदेशीर गोष्ट आहे. सकाळी फिरून आल्याने तुम्हाला केवळ फ्रेशच वाटणार नाही तर यामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्यही सुधारते. तसेच मॉर्निंग वॉक केल्याने तणाव(stress) आणि डिप्रेशन कमी होण्यास मदत होते. यामुळे वजनही(weight) नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय मॉर्निंग वॉक केल्याने अनेक गंभीर आजारापासून तुमचा बचाव होऊ शकतो. जसे डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर इत्यादी. मात्र तुम्हाला माहीत आहे का की योग्य डाएट आणि फूड्सचे सेवन केल्याने याचे लाभ वाढतात. तसेच तुमचे वजनही लवकर कमी होते. अशातच आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत की मॉर्निंग वॉक केल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. Eat this foods after morning walk, obesity will reduce

अधिक वाचा - मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य यांना उतरविण्याचा प्रयत्न

मॉर्निंग वॉकनंतर या गोष्टींचे करा सेवन

नट्स आणि ड्रायफ्रुट्स

नट्स आणि डाय फ्रुट्समध्ये हेल्दी फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात जे शरीर मजबूत बनवण्यात मदत करता. इतकंच नव्हे तर मॉर्निंग वॉक नंतर ड्रायफ्रुट्से सेवन केल्याने पाचन सुधारते आणि वजनही घटते. 

ओट्स खा

ओट्स हा फायबरचा खूप चांगला स्त्रोत आहे. यामुळे भूक नियंत्रित राहण्यास मदत होते. ओट्स खाल्ल्याने तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. यामुळे वजन घटवण्यास मदत मिळते. सोबतच अनहेल्दी फूड्स खाण्याचे क्रेव्हिंगही कमी होते. 

मोड आलेली कडधान्ये

मोड आलेली कडधान्ये जसे मूंग, सोयाबीन, चणे यामध्ये प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात तसेच वेट लॉस करणाऱ्यांसाठी हे एक चांगले फूड आहे. यासाठी सकाळी मॉर्निंग वॉक केल्यानंतर यांचे सेवन केल्यास शरीरास खूप फायदे मिळतात. 

अधिक वाचा- भारतीयांसाठी वाईट बातमी, पाकिस्तानने भारताला टाकले मागे

फळे खा

फळामध्ये डाएटरी फायबर मोठ्या प्रमाणात असतात. सोबतच शरीरास आवश्यक असलेले व्हिटामिन्स आणि मिनरल्सही मोठ्या प्रमाणात असतात. याशिवाय फळांमध्ये प्रोटीन आणि अँटी ऑक्सिडंटही चांगल्या प्रमाणात असते. फळे खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढत नाही आणि तुम्ही फिट राहता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी