हे पदार्थ खाल्ल्याने एका आठवड्यात पोटावरची चरबी होईल कमी

तब्येत पाणी
Updated Aug 06, 2018 | 17:09 IST | Times Now

शाकाहारी डाएटचे शरीराला खूप फायदे होतात. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो, तसेच डायबिटीज, लठ्ठपणा आणि काही प्रकारचे कॅन्सर बरे होतात.

weight loss
लठ्ठपणा  |  फोटो सौजन्य: Thinkstock

मुंबई : लठ्ठपणा ही सामान्य समस्या बनत चालली आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक काय काय नाही करत. वेगवेगळे प्रॉडक्ट, विविध व्यायामांचे प्रकार करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यात ते यशस्वी होतातच असे नाही. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सात दिवसांचा डाएट प्लान...याच्या सहाय्याने तुम्ही एक आठवड्यात पोटावरची चरबी कमी करू शकता.

शाकाहारी डाएटचे शरीराला खूप फायदे होतात. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो, तसेच डायबिटीज, लठ्ठपणा आणि काही प्रकारचे कॅन्सर बरे होतात. हल्ली ताजे पदार्थ खाण्यापेक्षा प्रोसेस्ड फूड, पॅकबंद केलेले पदार्थ खाण्याकडे अधिक कल असतो. यामुळे लठ्ठ होण्याची समस्या अधिक गंभीर होत आहे. यासोबतच डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयरोगासारख्या समस्याही सतावतात. जाणून घ्या कोणते आहे हे पदार्थ ज्यांनी तुम्ही एका आठवड्यात पोटावरची चरबी कमी करू शकता.

तृणधान्य 

तुमच्या आहारात तृणधान्ये ब्राऊन राईस, बार्ली, क्विनोआमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स असतात. यामुळे एनर्जी मिळते. १०० ग्रॅम ब्राऊन राईसमध्ये १११ कॅलरी असतात.

मशरूम 

मशरूममध्ये कॅलरी कमी प्रमाणात असले तरी मात्र यात प्रोटीन, फायबर आणि पाण्याचे प्रमाण कमी असते. तसेच मशरूम हा व्हिटामिन डी उत्तम स्त्रोत आहे. मशरूममध्ये पोटाचे वजनही कमी होते. 

बीन्स 

बीन्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, मिनरल्स, फायबर असतात. यामुळे मसल्सचे आरोग्य चांगले राहते. १ कप उकडलेल्या चवळीमध्ये १९८ कॅलरीज असतात.

हिरव्या भाज्या 

पालक, गाजर, कोबीसारखी दिसणारी हिरवी भाजी, ब्रोकोली, शलगम या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स आणि मिनरल्स असतात. यात कॅलरीज असतात पण फायबर आणि पाण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे डायजेशन सुधारते. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
हे पदार्थ खाल्ल्याने एका आठवड्यात पोटावरची चरबी होईल कमी Description: शाकाहारी डाएटचे शरीराला खूप फायदे होतात. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो, तसेच डायबिटीज, लठ्ठपणा आणि काही प्रकारचे कॅन्सर बरे होतात.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...