White Hair Solution: सध्या वयाच्या 25 किंवा 30 व्या वर्षी केस पांढरे होणे सामान्य झाले आहे. मात्र, ही एक गंभीर समस्या आहे,कारण तरुण वयात लोक म्हातारे दिसू लागले आहेत. घाबरू नका,निरोगी जीवनशैली,केसांची काळजी घेण्याच्या टिप्स आणि गुळासोबत मेथी खाल्ल्यास पांढऱ्या केसांपासून मुक्ती मिळू शकते. पांढऱ्या केसांवर घरगुती उपचार जाणून घेऊया.
जर तुम्हाला लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या असेल तर तुम्ही मेथी आणि गुळाचा घरगुती उपाय करू शकता. पांढरे केस काळे करण्यासाठी मेथीच्या दाण्यांची पावडर बनवा आणि नंतर 1 चमचा मेथी पावडर गुळाच्या तुकड्यासोबत रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या. हा घरगुती उपाय पांढरे केस काळे होण्यास मदत करतो आणि नवीन पांढरे केस येण्यापासून देखील प्रतिबंधित करतो.
नारळाचं तेल आणि लिंबू एकत्र मिसळून केसांमध्ये लावल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत. हे प्रमाण 2:1 असे असावे, म्हणजे दोन भाग नारळाचं तेल आणि एक भाग लिंबाचा रस असे मिश्रण असावे.
तसेच खोबरेल तेल गरम करावे आणि त्यात कढीपत्ता घालावा. कढीपत्ता तडतडेपर्यंत गरम होऊ द्यावा. नंतर हे तेल गाळून घ्यावे. आणि त्याच तेलाने केसांची मालिश करावी. यामुळे केस गळतंही नाहीत आणि पांढरेसुद्धा होत नाहीत. असे काही घरगुती उपाय करून तुम्ही केस पांढरे होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू शकता.
अधिक वाचा : लवकरच येतंय जगातील सर्वात खतरनाक विमान
कमी वयात केस पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, आनुवंशिकता, तणाव, प्रतिकारशक्तीची कमतरता, थायरॉईड, शरीरात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता, धूम्रपान इत्यादी कारणे असू शकतात. या समस्यांकडेही लक्ष द्या. आणि वेळीच उपाय करा.
अधिक वाचा : आजपासून बुध खेळणार सरळ खेळी, या राशींच्या करिअरमध्ये अडथळा
( डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही. )