Curd and Honey Combination: भारतात उष्णतेने कहर केला आहे, देशातील अनेक भागांमध्ये तापमान ४९ अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. अशा ऋतूमध्ये आपण असे अन्न खातो की जे थंड असतात आणि त्यांचा शरीराला जास्तीत जास्त लाभ मिळत असतो. दरम्यान या ऋतूमध्ये तुम्ही दही सेवन केले पाहिजे, त्यात थोडे मध घालावे.
साधारणपणे आपल्याला दही साखर किंवा मीठ घालून खायला आवडते, पण ते मधात मिसळून खाल्ल्यास हृदयविकाराचा झटका, अपचन यासारख्या समस्या दूर होतात. या दोन्ही एकत्र करण्याचे दोन फायदे आहेत, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत..
दही आणि मध एकत्र खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. दह्यामध्ये भरपूर कॅल्शियम आणि प्रथिने आढळतात, ज्यामुळे पोट आणि कंबरेभोवतीची चरबी कमी होते.
हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी, दही आणि मध मिसळणे फायदेशीर ठरू शकते. कारण त्यात आढळणारे फायटोकेमिकल्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयाशी संबंधित सर्व आजारांचा धोका टळतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. या गोष्टींचा अंमल करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्याव. टाइम्स नाउ याची पुष्टी करत नाही.)