Weight Loss Tips: वेगाने वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये करा या भाज्यांचा समावेश

तब्येत पाणी
Updated Sep 28, 2020 | 15:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

low-calorie vegetables:  लॉकडाऊनदरम्यान अनेकजण वजन वाढल्याची तक्रार करत आहेत. यातच तुम्ही आपल्या डाएटमध्ये भाज्यंचा समावेश केल्यास केवळ वजनच कंट्रोल होणार नाही तर हेल्दीही राहाल.

vegetables
वेगाने वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये नक्की खा या भाज्या 

थोडं पण कामाचं

  • वजन घटवण्यासाठी वर्कआऊट आणि योग्य खाणेपिणे महत्त्वाचे
  • वेगाने वजन घटवण्यासाठी भाज्यांचा डाएटमध्ये करा समावेश
  • या भाज्या तुम्ही लंच अथवा डिनरमध्ये खाऊ शकता

मुंबई: वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट(workout for weight loss) आणि खाणेपिणे(diet) महत्त्वाचे असते. दोघांचाही योग्य बॅलन्स असणे महत्त्वाचे आहे. वर्कआऊट आणि हेल्दी डाएट(healthy diet) घेतल्यास तुम्ही केवळ वजन कमी करू शकणार नाही तर हेल्दीही राहाल. आपल्या डाएटमध्ये भा्ज्यांचा(vegetables in diet) समावेश केल्यास तुम्ही हेल्दी राहू शकता. आठवड्यातून दोन वेळा या भाज्यांचा आहारात समावेश करा. 

या भाज्यांचा करा समावेश

गाजर - गाजर वजन कमी करण्यास मदत करतात. यात कमी कॅलरीज तसेच मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. तसेच फायबरही असतात. तुम्ही वजन घटवण्यासाठी याचा डाएटमध्ये समावेश करू शकता. गाजर तुम्ही कच्च्या स्वरूपात खा अथवा भाजी म्हणून. याशिवाय तुम्ही गाजराचा ज्यूसही पिऊ शकता. यामुळे फॅट बर्न होऊन तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Premier potager familial . . . . . #potager #eatyourveggies #carrot

A post shared by Catherine Graas (@catherinegraas) on

पालक- आर्यन आणि प्रोटीनशी परिपूर्ण पालकही भाजी तुमचे बेली फॅट कमी करण्यासाठी परफेक्ट भाजी आहे. यात फायबर, व्हिटामिन ए, सी आणि के, मॅग्नेशियम, आर्यन आणि मँगनीजसारखी तत्वे आहेत. पालकाला तुम्ही कोणत्याही रूपात डाएट म्हणून समाविष्ट करू शकता. वजन कमी करण्याशिवाय पालक डोळ्यांचे तेज वाढवणे, ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करणे तसेच ब्लड प्रेशर नियंत्रणात राखण्यास फायदेशीर ठरते. 

हिरवे मटार - हिरव्या मटारमध्ये फायबर आणि प्रोटीन चांगल्या प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीरातील फॅट कमी होते.  एक कप हिरव्या मटारमध्ये १२० ग्रॅम कार्ब्स असतात. यात कोलेस्ट्रॉल झिरो असतात. हिरवे मटर तुम्ही केवळ भाजीच नव्हे तर सलाड, सँडविच, पोहे यातही घालू शकतात. वजन कमी करण्यासोबतच यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात. 

मुळा - मुळ्यामध्ये सर्वात कमी कॅलरीज अतात. १०० ग्रॅम मुळ्यामध्ये केवळ ३.४ ग्रॅम कार्ब्स असता. जर तुम्हाला सतत खाण्याची इच्छा होत असेल तर मुळा खाण्यास सुरूवात करा. यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहील. यातील फायबर तुम्हाला बराच वेळ भूक लागू देत नाही. तुम्ही मुळा भाजी म्हणून अथवा सलाड म्हणून खाऊ शकता. 

बीट - बीट आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. बीटामुळे त्वचा, केस सुरक्षित राहण्यासोबतच अॅनिमिया, मधुमेह, कोलेस्ट्रॉल सारखे आजार दूर राहण्यास मदत होतात. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. तसेच साखर जास्त असते. हे दररोज खाल्ल्याने तुम्ही नक्कीच वजन कमी करू शकता. याशिवाय यात फायबर्स असल्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी