Triphala For Weight Loss : मुंबई : कामाच्या निमित्ताने तासन् तास खुर्चीत बसणे, धकाधकीची जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे यांचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत असतो. त्याचा सर्वात मोठा परिणाम आपल्या पोटावर आणि कंबरेवर दिसू लागतो. तुम्ही आजूबाजूला असे अनेक लोक पाहिले असतील, ज्यांची बॉडी शेफ खूप खराब झाली आहे. अनेकांच्या पोटाची चरबी वाढून कंबरेचा आकारही बदलेला आहे. शरीराचा आकार बदलल्यानंतर त्या व्यक्तीचा रुबाब चांगला दिसत नाही. यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होत असतो आणि सार्वजनिक ठिकाणी त्याला लाजिरवाणेपणाला सामोरे जावे लागू शकते.
वास्तविक, सध्या वजन कमी करणे हे आव्हानापेक्षा कमी नाही आणि पोटाची चरबी कमी करणे त्याहूनही कठीण आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी लोक औषधांचाही सहारा घेतात, त्यामुळे शरीराला अनेक दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागू शकते. त्याचबरोबर लठ्ठपणामुळे निरनिराळ्या आजरांना निमंत्रण दिल जात असतं. अशा परिस्थितीत पोटाची समस्या टाळण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपायांकडे वळणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत वजन कमी करण्यासाठी एक अनोखी आयुर्वेदिक उपाय.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, त्रिफळा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि पचनक्रिया मजबूत करते. त्रिफळा चूर्ण पोटाची चरबी कमी करण्यासाठी गुणकारी आहे. याचे नियमित सेवन करावे. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण मिसळून रोज घेऊ शकतात.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत त्रिफळाचं सेवन करू शकता. यासाठी त्रिफळा पाण्यात भिजवून ते पाण्यात उकाळून घ्या. थोड्या वेळाने कोमट पाणी प्यावे. काही दिवसातच तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळण्यास सुरुवात होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. या उपयाचा अमंल करणापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. टाइम्स नाउने याची पुष्टी केलेली नाही.)