Weight Loss from Yogurt : दही खा वजन कमी करा

eat yogurt for weight loss : दही खाऊन वजन कमी करणे शक्य आहे. यासाठी दररोजच्या आहारात दह्याचा समावेश करा.

eat yogurt for weight loss
Weight Loss from Yogurt : दही खा वजन कमी करा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Weight Loss from Yogurt : दही खा वजन कमी करा
  • दही खाऊन वजन कमी करणे शक्य
  • दररोजच्या आहारात दह्याचा समावेश करा

eat yogurt for weight loss : हल्ली वजन कमी कसं करावं याची चिंता अनेकांना असते. कमीत कमी त्रास घेऊन वजन कमी करण्याचा उपाय अनेकजण शोधत असतात. या सर्व मंडळींसाठी आनंदाची बातमी... दही खाऊन वजन कमी करणे शक्य आहे. यासाठी दररोजच्या आहारात दह्याचा समावेश करा.

  1. दररोज मर्यादीत प्रमाणात दही खा. शक्यतो सकाळी नाश्ता करण्याच्यावेळी किंवा दुपारी जेवणाच्यावेळी दही खा. रात्री दही खाणे टाळा. 
  2. दही खाण्याने कॅल्शियम, व्हिटॅमिन बी २, व्हिटॅमिन बी १२, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे शरीराला आवश्यक घटक मिळतील.
  3. दही हाडं मजबूत करेल, स्नायूंना ऊर्जा उपलब्ध करून देईल
  4. दही पचनक्षमता सुधारण्यास मदत करेल
  5. दही शरीराला प्रोटिन उपलब्ध करुन देईल
  6. काही काळ खाल्ले नाही तरी दही खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळू शकेल. सतत भूकेची जाणीव होणार नाही.
  7. दररोज मर्यादीत प्रमाणात दही खाणे आणि दिवसातून किमान एक तास वेगाने धावणे अथवा वेगाने चालणे असा व्यायाम केल्यास वजन कमी होण्याचा वेग वाढण्यास मदत होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी