पेरू खाणे पुरुष आणि गरोदर महिलांसाठी फायद्याचे

Eating guava is beneficial for men and pregnant women, 8 Benefits of Eating Guava : पेरू (guava) हे एक आंबट गोड फळ आहे. या फळाला अमरूद असेही म्हणतात. पेरू खाल्ल्याने शरीराला क, अ आणि के ही तीन जीवनसत्वांचा लाभ होतो.

Benefits of Eating Guava
पेरू खाणे पुरुष आणि गरोदर महिलांसाठी फायद्याचे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • पेरू खाणे पुरुष आणि गरोदर महिलांसाठी फायद्याचे
 • सर्वाधिक क जीवनसत्व पुरवणाऱ्या फळांमध्ये आवळ्यानंतर दुसरा क्रमांक पेरू या फळाचा
 • पेरू खाल्ल्याने शरीराला लोह मिळते

Eating guava is beneficial for men and pregnant women, 8 Benefits of Eating Guava : पेरू (guava) हे एक आंबट गोड फळ आहे. या फळाला अमरूद असेही म्हणतात. पेरू खाल्ल्याने शरीराला क, अ आणि के ही तीन जीवनसत्वांचा लाभ होतो. सर्वाधिक क जीवनसत्व पुरवणाऱ्या फळांमध्ये आवळ्यानंतर दुसरा क्रमांक पेरू या फळाचा लागतो. पेरू खाल्ल्याने शरीराला आवश्यक लोह (आयर्न) या खनिजाचा पण लाभ होतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात (थंडीच्या दिवसांत) होणाऱ्या अनेक आजारांपासून संरक्षण देणारे फळ म्हणून पेरू आरोग्यासाठी फायद्याचे आहे.

जाणून घ्या पेरू खाण्याचे फायदे (Benefits of Eating Guava)

 1. पचनक्षमता : दररोज एक पेरू खाल्ल्याने शरीराला क, अ आणि के ही तीन जीवनसत्वांचा तसेच लोह (आयर्न) या खनिजाचा लाभ होतो. पचनक्षमता सुधारण्यास मदत होते.
 2. पोटाचे विकार : दररोज एक पेरू खाल्ल्याने पोटाचे अनेक विकार बरे होण्यास आणि जंतांचा त्रास कमी होण्यास मदत होते. याच कारणामुळे लहान मुलांना आणि मोठ्यांना दररोज एक पेरू खाण्याचा सल्ला दिला जातो.
 3. अपचन, बद्धकोष्ठता : दररोज एक पेरू खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता या समस्यांचा त्रास कमी होण्यास मदत होते.
 4. मधुमेह : पेरू या फळात भरपूर फायबर आहे तसेच हे फळ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राखण्यास मदत करते. 
 5. वजन : पेरू खाल्ल्यामुळे अन्न पचण्यास मदत होते तसेच वजन नियंत्रणात राखण्यास मदत होते.
 6. गरोदर महिलांसाठी पेरू फायद्याचा : गरोदर महिलांना दररोज एक पेरू खाल्ल्याने क, अ आणि के ही तीन जीवनसत्वांचा तसेच लोह (आयर्न) या खनिजाचा लाभ होतो. शरीराला भरपूर फायबर मिळते.
 7. दातांचे दुखणे : पेरू खाल्ल्याने दातदुखीच्या त्रासात आराम मिळतो. तोंडाला येणारी दुर्गंधी पेरू खाल्ल्याने कमी होण्यास मदत होते.
 8. रोगप्रतिकारक क्षमता (Immunity) : पेरू खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता अर्थात इम्युनिटी वाढते तसेच तणावामुळे होणारे त्रास कमी होण्यास मदत होते.

ayurveda tips : दुधी खा, निरोगी राहा; जाणून घ्या दुधी खाण्याचे फायदे

Hair Growth Tips: सुंदर-लांबसडक केसांसाठी आहारात घ्या हे जीवनसत्त्व, केसांची वाढ पाहून थक्क व्हाल

Disclaimer / डिस्क्लेमर : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी