थंडीच्या दिवसात गुळ खाण्याचे होतील भरपूर फायदे

eating jaggery benefits health दररोज थोडा गुळ खाणे आरोग्यासाठी फायद्याचे

eating jaggery benefits health
थंडीच्या दिवसात गुळ खाण्याचे होतील भरपूर फायदे 

थोडं पण कामाचं

  • थंडीच्या दिवसात गुळ खाण्याचे होतील भरपूर फायदे
  • गुळात भरपूर पोषक तत्व
  • शरीराचा थकवा आणि अशक्तपणा दूर होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते

मुंबईः नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. हळू हळू थंडी पडू लागेल. थंडीच्या दिवसात गुळ (jaggery) खाण्याचे खूप फायदे होतात. थंडी पडण्यास सुरुवात होण्याआधीच दररोज थोडा गुळ खाणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल. गुळ आरोग्यासाठी गुणकारी आहे. नियमित गुळ खाण्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. त्वचा उजळण्यास मदत होते. या व्यतिरिक्तही गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊ गुळ खाण्याचे फायदे... (eating jaggery benefits health)

गुळात भरपूर पोषक तत्व

गुळामध्ये भरपूर पोषक तत्व समावली आहेत. जीवनसत्व अ (Vitamin A) आणि जीवसत्व ब (Vitamin B), तीन प्रकारच्या नैसर्गिक शर्करा (Sucrose, Fructose, glucose), प्रथिने (Protein), लोह (Iron), कॅल्शिअम (Calcium), फॉस्फरस (Phosphorus), पोटॅशिअम (Potassium), मॅग्नेशिअम (Magnesium), जस्त (Zinc), मँगनीज (Manganese) अशा शरीराला आवश्यक पोषक तत्वांनी संपन्न आहे गुळ. खनिजांनी संपन्न असलेला गुळ त्वचेसाठी नैसर्गिक क्लींझरचे काम करतो. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. गुळातील नैसर्गिक शर्करा शरीराचा थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यास मदत करते. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी गुळ लाभदायी आहे. नियमित गुळ खाल्ल्याने तब्येत उत्तम राहण्यास आणि सौंदर्यवृद्धीसाठी मदत होते.

त्वचा उजळवणारा गुळ

एक चमचा गुळाची पावडर, एक चमचा टोमॅटोचा रस, एक चमचा लिंबू रस, चिमूटभर हळद यांचे मिश्रण करुन त्वचेला लावावे. हा लेप १५ मिनिटे तसाच ठेवून पाण्याने धुवावा. या कृतीमुळे त्वचा उजळण्यास मदत होते. दररोज त्वचेला हा लेप लावल्यास त्वचेवरील अनेक प्रकारचे डाग, व्रण हळू हळू निघून जातात.

सुरकुत्या कमी करणारा गुळ

एक चमचा गुळाची पावडर, एक काळ्या चहाची पावडर, एक चमदा द्राक्षाचा रस, चिमूटभर हळद, थोडे गुलाब पाणी यांचे मिश्रण करुन शरीराच्या सुरकुत्या आलेल्या भागाला लावावे. हा लेप २० मिनिटे तसाच ठेवून पाण्याने धुवावा. या कृतीमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. 

गुळ खाण्याचे फायदे

अॅसिडिटीचा त्रास कमी होतो

दररोज थोड्या प्रमाणात गुळाचे सेवन केल्यास अॅसिडिटी, अपचन, गॅस असे अनेक पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते. गुळ, सैंधव मीठ आणि काळे मीठ यांचे मिश्रण खाल्ल्याने अॅसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

शरीरातील शुद्ध रक्ताची कमतरता दूर होते

नियमित गुळाचे सेवन केल्यास शरीरातील शुद्ध रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. 

रक्तदाब नियंत्रणात राहतो

दररोज गुळ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

हाडे मजबूत होतात

दररोज थोडा गुळ खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक कॅल्शिअम आणि फॉस्फरस गुळातून शरीराला मिळते. गुळ आणि आल्याचे मिश्रण करुन त्याचे दररोज सेवन केल्यास हाडांशी संबंधित दुखणी कमी होण्यास मदत होते. सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

सर्दी पडश्यात लाभदायी आहे गुळ

सर्दी पडसे झाल्यास गुळाचे सेवन लाभदायी ठरते. काळी मिरी आणि आल्यासोबत गुळाचे मिश्रण तयार करुन ते दररोज खाल्ल्यास सर्दीचा त्रास लवकर कमी होतो. साखरेऐवजी गुळ खाणे कधीही चांगले. साखरेच्या तुलनेत गुळ पचायला हलका आहे. आल्यासोबत गुळाचे सेवन केल्यास घसादुखी, आवाज बसणे किंवा घसा बसणे, घसा खवखवणे अशा समस्या दूर होतात. 

शरीराचा थकवा आणि अशक्तपणा दूर होतो

बाहेरून थकून आलेल्या व्यक्तीने शांतपणे बसून गुळाचा छोटा खडा अथवा एक चमचा गुळाची पावडर चावून खावी आणि नंतर एक ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीराचा थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. दुधात साखरेऐवजी गुळ घालून ते दूध प्यावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दुधात हळद आणि गुळ घालून हे दूध प्यावे. दूध आवडत नसल्यास एक ग्लास पाण्यात पाच ग्रॅम गुळ, थोडा लिंबू रस आणि काळे मीठ घालून ढवळून घ्या. नंतर हे पाणी प्या. हे पाणीही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी मदत करते

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी