Namkeen Side Effects For Health । मुंबई : रोज सकाळ संध्याकाळ चहासोबत खारट पदार्थ खाण्याचीही काही लोकांना सवय असते. मात्र त्यांची ही सवय किती जीवघेणी ठरू शकते याची त्यांना कदाचित कल्पना देखील नसेल. लक्षणीय बाब म्हणजे चहासोबत खारट पदार्थ खाणाऱ्या लोकांना नकळत गंभीर आजार होत असतात. खर तर चहासोबत तुम्ही जितके खारट पदार्थ खाल्लं तितके जास्त नुकसान होते. काही लोक तर खारट चवीसमोर सर्वकाही विसरून जातात आणि त्याचे रोज सेवन करतात. विशेष म्हणजे फक्त खारटच नाही तर त्यासोबत चहा पिणेदेखील आरोग्यासाठी हानिकारक आहे. चला तर म जाणून घेऊया चहासोबत खारट पदार्थ खाण्याचे दुष्परिणाम. (Eating Namkeen with tea can cause very serious illnesses).
अधिक वाचा : राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारासाठी 'या' नावांवर चर्चा
पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, खारट पदार्थ आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. ते बनवण्याची प्रक्रिया सर्वात हानिकारक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. खर तर खारट पदार्थांमध्ये वापरलेले पीठ म्हणजे रिफाइन्ड कार्बोहायड्रेट, जे ओळखण्यासाठी खूप वेळ लागतो आणि त्यामुळे शरीरातील चरबी देखील वाढते. कारण ते थेट इन्सुलिन फॅट गेन हार्मोन ट्रिगर करण्याचे काम करते.
तज्ज्ञांनी आणखी सांगितले की, यानंतर जेव्हा पुढील प्रक्रिया केली जाते तेव्हा त्यात रिफाइंड सोया तेल किंवा मोहरीचे तेल वापरले जाते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होऊ लागतो. अशा परिस्थितीत यामुळे तुम्हाला बीपीचा घातक आजार होऊ शकतो. यासोबतच त्यांनी सांगितले की, खारट आणि चहामधून शुगर कोटिंगसारखे टॉक्सिन शरीरात प्रवेश करतात, त्यामुळे तुमच्या यकृतावरही परिणाम होऊ शकतो. म्हणजेच याच्या सेवनाने तुम्हाला एक नाही तर अनेक मोठे आजार होऊ शकतात. त्यामुळे सकाळच्या चहावेळी अथवा इतर कधीही चहासोबत खारट खाणे टाळले पाहिजे. यामध्ये खारट बिस्किटांपासून टोस्टचा समावेश आहे.
डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.