Papaya Benefits in Summer season: उन्हाळ्यात थंड पदार्थ किंवा ज्या पदार्थांमुळे शरीराला थंडावा मिळेल असे खाणे-पिण्याला नागरिक प्राधान्य देतात. पपईचा प्रभाव खूपच गरम आहे मग उन्हाळ्यात पपई खावी की नाही? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. तुम्हालाही हा प्रश्न भेडसावत असेल तर जाणून घ्या सविस्तर...
उन्हाळ्यात पपईचे सेवन करता येऊ शकते. मात्र, पपई गरम असल्याने मर्यादित प्रमाणातच त्याचे सेवन करावे. पपईत व्हिटॅमिन सी, फोलेट, व्हिटॅमिन ए यासारखे पोषक घटक असतात. हे घटक आरोग्यासाठी खूपच आवश्यक असतात आणि त्याचा आरोग्याला खूप फायदा होतो. जाणून घ्या पपईचे आरोग्यदायक फायदे
उन्हाळ्यात मधुमेह झालेल्या रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी अनेकदा असंतुलित आराहामुळे वाढते. अशावेळी या समस्येपासून मुक्ततेसाठी तुम्ही पपई खाऊ शकता. पपई खाल्ल्याने मधुमेहाच्या समस्येत दिलासा तर मिळेलच आणि त्यासोबतच रक्तदाबही नियंत्रणात राहील.
हे पण वाचा : दूध प्यायल्याने कॅन्सर होऊ शकतो?
मासिक पाळीच्या अनियमिततेमुळे अनेक महिला त्रस्त असतात. मासिक पाळी येण्यास उशीर झाल्यास त्रास होत असेल तर यासाठी पपईचे सेवन करू शकता. जर तुम्ही दररोज मर्यादित प्रमाणात पपईचे सेवन केले तर मासिक पाळीच्या अनियमिततेची समस्या दूर होण्यास मदत होईल.
हे पण वाचा : हाता-पायाला मुंग्या येतात? जाणून घ्या घरगुती आणि रामबाण उपाय
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी पपई खूपच फायदेशीर ठरेल. फायबर समृद्ध असलेली पपई खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होईल. पपई खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. परिणामी तुम्ही जास्त खाणं टाळता. त्यामुळे सकाळी उठल्यावर पपई खाल्ली तर दिवसभर भूक लागणार नाही.
हे पण वाचा : व्यायाम करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
जर तुम्ही दिवसभर लॅपटॉप, कम्प्युटरच्या स्क्रीनसमोर बसून काम करत असाल तर पपईचे सेवन करणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. पपईत व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळते आणि हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला आपली दृष्टी वाढवायची असेल तर तुम्ही नियमितपणे पण मर्यादित प्रमाणात पपई खाऊ शकता.
हे पण वाचा : उन्हाळ्यात या फुलाचे पाणी तुमच्यासाठी ठरेल संजीवनी
बदलत्या वातावरणात व्हायरल होण्याचा धोकाही अधिक असतो. अशा स्थितीत तुमची रोग प्रतिकारकशक्ती चांगली राहणे महत्त्वाचे आहे. रोग प्रतिकारकशक्ती वाढवायची असल्यास तुम्ही पपई खाऊ शकता. व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेली पपई खाल्ल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नका. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)