Egg Eating Benefits: एका दिवसात एवढी अंडी खाल्ल्याने वाढतो कोलेस्टेरॉलचा धोका

तब्येत पाणी
Updated May 27, 2022 | 11:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

Eggs and Cholesterol | अंडी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. त्यामुळेच 'संडे असो की मंडे रोज खा अंडे' असे बोलले जाते.

Eating so many eggs in one day increases the risk of cholesterol
एका दिवसात एवढी अंडी खाल्ल्याने वाढतो कोलेस्टेरॉलचा धोका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अंडी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात.
  • चांगले कोलेस्ट्रेरॉल शरीराच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते जे अंड्यांमध्ये असते.
  • आरोग्य तज्ञांच्या मते एका दिवशी एक अंडे खाणे पुरेसे आहे.

How Many Eggs Should I Eat In A Day । मुंबई : अंडी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. त्यामुळेच 'संडे असो की मंडे रोज खा अंडे' असे बोलले जाते. दरम्यान काही लोकांचा असा समज आहे की जास्त अंडी खाल्ल्याने नसांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे ते हे सुपरफूड खाणे टाळू लागतात. चला तर म जाणून घेऊया दिवसभरात किती अंडी खावीत, यामुळे आरोग्याला हानी पोहोचणार नाही.

अधिक वाचा : आज सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन करणार PM मोदी 

अंड्यामध्ये असते चांगले कोलेस्टेरॉल 

चांगले कोलेस्ट्रेरॉल शरीराच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते जे अंड्यांमध्ये चांगल्या प्रमाणात आढळते. पण खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच एलडीएलच्या अतिसेवनामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका निर्माण होतो.

आरोग्यासाठी अंडी फायदेशीर 

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एका संपूर्ण अंड्यात चिकनइतकेच पोषक घटक असतात. त्यात चांगले कोलेस्टेरॉल आहे जे सेल मेम्ब्रेन, इस्ट्रोजेन, कोर्टिसोल आणि टेस्टोस्टेरॉन सारख्या आवश्यक हार्मोन्सच्या निर्मितीस मदत करते. शरीरात असलेले यकृत नैसर्गिकरित्या कोलेस्टेरॉल तयार करते, परंतु जेव्हा आपण हाय कोलेस्टेरॉल आहार घेतो तेव्हा ते शरीरातील कोलेस्टेरॉल बनवण्याचे प्रमाण कमी करते. 

अधिक वाचा : आज RR की RCB कोण मिळवणार फायनलचे तिकीट? पाहा आकडेवारी

अंडी आणि कोलेस्टेरॉलचे नाते 

अंड्यातील पिवळ्या भागाला अंड्यातील पिवळे बलक असे म्हणतात. त्यात सुमारे १८६ मिलीग्राम कोलेस्टेरॉल असते, जे दैनंदिन सेवनाच्या सुमारे ६० टक्क्यांपेक्षा थोडे जास्त असते, तर अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. 

एका दिवसात किती अंडी खावावीत?

आरोग्य तज्ञांच्या मते एका दिवशी एक अंडे खाणे पुरेसे आहे, जर तुम्ही नियमित अंडी जास्त प्रमाणात खात असाल तर त्याचा प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. अंडी खाल्ल्याने वाईट कोलेस्टेरॉलवर फारसा परिणाम होत नसला तरी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक योग्य नाही. अंड्याची चव गरम असल्याने ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने इतर काही समस्या उद्भवू शकतात.

ही लोक खाऊ शकतात जास्त अंडी 

जी लोक जास्त शारीरिक हालचाली करतात ते दररोज २ ते ३ अंडी खाऊ शकतात. जास्त अंडी खाल्ल्याने हृदयविकार होतो याचा कोणताही पुरावा नाही. जर टाईप २ डायबिटीजच्या रुग्णांनी दररोज एक अंडे खाल्ले तर त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर कोणताही परिणाम होत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी