Weight loss tips : रात्री झोपण्यापूर्वी या 3 गोष्टी खाल्ल्याने पोटाची चरबी कमी होईल, तुम्हाला 'जाड' म्हणून हिणवलं जाणार नाही

तब्येत पाणी
Updated May 10, 2022 | 13:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight loss tips :जर तुम्हीही लोकांचे टोमणे ऐकून कंटाळला असाल तर हे 3 घरगुती उपाय करून तुम्ही शरीरातील चरबी कमी करू शकता. या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

Eating these 3 things before going to bed will reduce belly fat
पोटाची चरबी कमी करण्याचे उपाय  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शरीरातील चरबी कमी करण्यासाठी पुदीना, दालचिनी, आणि हळदीचं दूध उपयुक्त
  • अपुरी झोप आणि जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे चरबी वाढते
  • दारू आणि धुम्रपानामुळे चरबी वाढते.

Weight loss tips : शरीरावरील वाढत्या चरबीमुळे बरेच लोक इतके अस्वस्थ होतात की त्यांना काम करणे देखील कठीण होते. शरीरावर जास्त चरबी असल्याने लोक त्यांना गुबगुबीत, जाड्या किंवा जाडी या नावाने ओळखतात. शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करणे हे कोणत्याही व्यक्तीसाठी आव्हानापेक्षा कमी नाही.वजन कमी करण्यासाठी लोकांना डाएटिंगपासून तीव्र वर्कआउट्स, घरगुती उपायांपर्यंत सर्व प्रकारचे व्यायाम करायला आवडतात, पण त्याचा फायदा होत नाही तेव्हा ते थकून घरी बसतात. जर तुम्हीही लोकांचे टोमणे ऐकून कंटाळला असाल तर हे 3 घरगुती उपाय करून तुम्ही शरीरातील चरबी कमी करू शकता. या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.


1. चरबी कमी करण्याचे उपाय


खूप मेहनत करूनही तुमचे वजन कमी होत नाही, तर तुम्ही या तीन सोप्या पद्धतींच्या मदतीने वजन कमी करू शकता 
1- पुदिना 
2- दालचिनी 
3- हळद दूध 
पण ते कसे वापरायचे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.


चला तुम्हाला सांगतो पण त्याआधी वजन वाढण्यामागील लपलेली कारणे जाणून घेऊया.


2. चरबी वाढण्याची कारणे


चरबी वाढण्याची कारणं
1- जास्त वेळ एकाच ठिकाणी बसणे 
2- जेवल्यानंतर लगेच झोपणे 
3- अपुरी झोप आणि तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे
4- दारू आणि धूम्रपानामुळेही चरबी वाढते. 


3. पुदीना

तुम्ही विचार करत असाल की पुदीना पोटाची चरबी कशी कमी करू शकते? आम्ही तुम्हाला सांगतो की पुदिन्यात असलेले अँटी-ऑक्सिडेंट तुमच्यासाठी आश्चर्यकारक काम करतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दररोज झोपण्यापूर्वी पुदिन्याची पाने चावू शकता किंवा झोपण्यापूर्वी पुदिन्याचा चहा पिऊ शकता. जर तुम्हाला चहा प्यायचा नसेल तर तुम्ही पुदिन्याची पाने चटणी किंवा रायतामध्ये वापरू शकता.


4. दालचिनी

दालचिनीचा वापर त्वचेच्या काळजीसाठी असो किंवा वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारांमध्ये केला जातो. दालचिनीमध्ये असलेले गुणधर्म चयापचय वाढवण्याचे काम करतात. इतकेच नाही तर दालचिनीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटीबायोटिक गुणधर्म तुम्हाला दालचिनीच्या चहाला डिटॉक्स ड्रिंक बनवण्याचे काम करतात, जे तुमच्या शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. 
झोपण्यापूर्वी हा चहा प्यायल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. 


5. हळद घातलेलं दूध

रात्री झोपण्यापूर्वी दुधात हळद मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो कारण यामुळे तुम्हाला चांगली झोप येते. पण तुम्हाला माहित आहे का की या रेसिपीमुळे तुमचे वजन कमी होऊ शकते? हळदीचे दूध तुमचे पचन सुधारते, ज्यामुळे तुमच्या शरीरात चरबी जमा होत नाही. हळदीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करतात. त्याच वेळी, दुधामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर असते, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी