Mens Health: या ४ गोष्टी खाल्ल्याने शुक्राणूंच्या संख्येत होते वाढ; पुरूषांची कमजोरीपासूनही होते सुटका

तब्येत पाणी
Updated Jun 10, 2022 | 12:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Married Men's Health । लग्नानंतर पुरूषांच्या जबाबदारीत आणखी वाढ होत असते. त्यामुळे ते आरोग्याची विशेष काळजी घेण्यात कुठेतरी मागे राहतात. त्यामुळे परिणामी त्यांना हळूहळू शारीरिक कमजोरीचा सामना करावा लागतो.

Eating these 4 things increase the number of sperm, Men also get rid of weakness
या ४ गोष्टी खाल्ल्याने शुक्राणूंच्या संख्येत होते वाढ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लग्नानंतर पुरूषांच्या जबाबदारीत आणखी वाढ होत असते.
  • डाळिंब हे एक अतिशय फायदेशीर फळ आहे.
  • गाजर ही एक अशी भाजी आहे जी सॅलडच्या स्वरूपात भरपूर वापरली जाते.

Married Men's Health । मुंबई : लग्नानंतर पुरूषांच्या जबाबदारीत आणखी वाढ होत असते. त्यामुळे ते आरोग्याची विशेष काळजी घेण्यात कुठेतरी मागे राहतात. त्यामुळे परिणामी त्यांना हळूहळू शारीरिक कमजोरीचा सामना करावा लागतो. लक्षणीय बाब म्हणजे त्यांची प्रजनन क्षमता आणि शुक्राणूंची संख्या कमी होऊ लागते. पण जर तुम्ही काही हेल्दी पदार्थ खाल्ले तर प्रजनन क्षमता चांगली राहते आणि वडील होण्यात कोणतीच अडचण येत नाही. (Eating these 4 things increase the number of sperm, Men also get rid of weakness). 

अधिक वाचा : लैंगिक शोषणप्रकरणी दोषी शिक्षकाला ठोठावली ६ वर्षांची शिक्षा

शुक्राणूंची संख्या वाढवणारी फळे 

  1. डार्क चॉकलेट - आपल्यापैकी क्वचितच असे कोणी असेल ज्याने आपल्या आयुष्यात चॉकलेट खाल्ले नसेल, परंतु त्यात साखरेचे प्रमाण इतके जास्त आहे की चॉकलेट कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण जर तुम्ही डार्क चॉकलेट खाल्ले तर त्यात कोको आणि अमिनो ॲसिड्स मोठ्या प्रमाणात मिळतील आणि त्यामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या वाढेल.
  2. डाळिंब - डाळिंब हे एक अतिशय फायदेशीर फळ आहे यात शंका नाही तसेच हे फळ पुरुषांच्या शरीरात शुक्राणूंची संख्या वेगाने वाढवण्यास मदत करते. लक्षणीय बाब म्हणजे डाळिंबामुळे शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते. डाळिंबाचे सेवन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याचा रस पिणे किंवा सॅलड म्हणून खाणे.
  3. अंडी - अंड हे एक असे फूड आहे ज्यामध्ये भरपूर प्रथिने आढळतात, तसेच ते खाल्ल्याने व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात मिळते. अंड्याचे सेवन आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर मानले गेले आहे. कारण त्यात असलेल्या झिंकच्या मदतीने ते शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करते. उकडलेले अंडे खाल्ले तर जास्त फायदा होतो कारण आम्लेटमध्ये तेलाचे प्रमाण असते.
  4. गाजर - गाजर ही एक अशी भाजी आहे जी सॅलडच्या स्वरूपात भरपूर वापरली जाते, यामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या वाढ होते. कारण ते शुक्राणूंना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवते तसेच गाजराचा रस पिणे चांगले आहे.

डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी