Health Tips: वारंवार पोट फुगण्याच्या समस्येवर रामबाण उपाय, रिकाम्यापोटी चावा ही पाने 

तब्येत पाणी
Updated May 17, 2022 | 11:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

Leaves For Bloating । अनेक लोकांना वारंवार पोट फुगण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. हे सतत बाहेरचे खाणे आणि कमकुवत पचन यांमुळे होते. जर तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर यावर काही घुरगुती रामबाण उपाय आहेत.

Eating these leaves can be beneficial for stomach health
वारंवार पोट फुगण्याच्या समस्येवर रामबाण उपाय, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अनेक लोकांना वारंवार पोट फुगण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.
  • कोथिंबीर खाल्ल्याने सूज येणे थांबते, तसेच पोटाला ताजेपणाही येतो.
  • पुदीन्याच्या पानांमध्ये आढळणारे दाहक-विरोधी गुणधर्म पोटाच्या समस्या यांपासून आराम देतात.

Leaves For Bloating । मुंबई : अनेक लोकांना वारंवार पोट फुगण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. हे सतत बाहेरचे खाणे आणि कमकुवत पचन यामुळे होते. जर तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर यावर काही घुरगुती रामबाण उपाय आहेत. खरं तर अशी काही पाने (Leaves) आहेत जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. ते खाल्ल्याने पोटदुखी, ॲसिडीटी, पोट फुगणे (Bloating) आणि पोटात गॅस (Stomach Gas) होण्यासारख्या रोजच्या समस्यांपासून आराम मिळतो. (Eating these leaves can be beneficial for stomach health). 

अधिक वाचा : राज्यातील तापमानाचा पारा वाढविण्याचं काम वृक्षानीच केलं

पोटाच्या आरोग्यासाठी पाने (Leaves For Stomach Health) 

१) कोथिंबीर ही अशी पाने आहेत जी तुम्ही सहज चावू शकता. कोथिंबीर खाल्ल्याने सूज येणे थांबते, तसेच पोटाला ताजेपणाही येतो.

२) पोटासाठी फायदेशीर औषध म्हणजे तमालपत्र (Bay leaf). तमालपत्र पचनासाठी रामबाण उपाय म्हणून काम करते. या पानांमध्ये आढळणारे एन्झाइम चयापचय सुधारण्यासाठी आणि पचन सुधारण्याचे काम करतात. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील उपयुक्त आहे. जर ही पाने चघळणे अवघड असेल तर तुम्ही त्यांचा वापर अन्नात करू शकता.

३) तिसरे पान जे पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते ते म्हणजे कडुलिंब (Neem). कडुलिंब चघळल्याने केवळ पोटाच्या आरोग्यावरच नाही तर त्वचेच्या आरोग्यावरही परिणाम होतो. त्यांचे सेवन केल्याने तुमचे पचन देखील चांगले होईल आणि फोड आणि पिंपल्स सारख्या समस्यांपासूनही सुटका मिळेल.

४) पुदीन्याच्या (Mint Leaves) पानांमध्ये आढळणारे दाहक-विरोधी गुणधर्म पोटाच्या समस्या यांपासून आराम देतात. ही पाने पचनक्रिया सुधारतात आणि पोटात ताजेपणा आणतात, जे ॲसिडीटी आणि गॅसच्या बाबतीत खूप फायदेशीर ठरतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी