Food For Heart: हृदय विकाराचा झटका टाळण्यासाठी हे पिवळे पदार्थ खाल्ल्यास असा फायदा होईल

तब्येत पाणी
Updated Jul 16, 2022 | 21:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Healthy Heart: भारतात हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे, याचे कारण हे आहे की आपण आपल्या दैनंदिन जीवनात भरपूर तेलकट पदार्थ खातो, त्याऐवजी आरोग्यदायी पदार्थ निवडणे योग्य आहे.

Eating these yellow foods will help prevent heart attack
हे पिवळे पदार्थ खाल्ल्यास असा होईल फायदा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हार्ट अटॅक टाळण्यासाठी हे पिवळे पदार्थ खा
  • तेलकट खाल्ल्याने हृदय विकाराचा धोका वाढतो
  • आंबा, लिंबू, केळं, अननस, पिवळी भोपळी मिरची योग्य प्रमाणात खावे

Benefits Yellow Foods For Heart: हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, तो आयुष्याच्या सुरुवातीपासून शेवटच्या श्वासापर्यंत धडधडत असतो. 
याची काळजी न घेतल्यास हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल वेसल डिसीज यांसारखे धोकादायक आणि जीवघेणे आजार होण्याचा धोका कायम आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या दैनंदिन आहारातून तेलकट पदार्थ वगळून केवळ आरोग्यदायी गोष्टी खाणे गरजेचे आहे. काही पिवळी फळे आणि भाज्या खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारले जाऊ शकते.


हे पिवळे पदार्थ खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका टाळता येईल


1. आंबा (Mango)

आंब्याचे नाव ऐकताच तोंडाला चव येते, या गोड आणि स्वादिष्ट फळाचा आस्वाद घेता यावा यासाठी आपण उन्हाळ्याची वाट पाहतो, हे देखील जाणून घ्या की ते हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे.

2. लिंबू   (Lemon)

लिंबू हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध अन्न आहे, ज्याचा वापर सॅलडपासून लिंबूपाणीपर्यंत केला जातो, तो हृदयाचे आरोग्य सुधारण्यास तसेच वजन कमी करण्यास मदत करतो.


3. केळे (Banana)

आपल्यापैकी कोणीतरी असेल ज्याने कधीच केळी खाल्लेली नसतील ते खाणे जितके सोपे असेल तितकाच फायदा होईल. मर्यादित प्रमाणात केळी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि आरोग्याला फायदा होतो


4 अननस (Pineapple)

अननसाचा गोडवा साऱ्यांना सहज आकर्षित करतो. पण तुम्हाला माहित आहे का की ते खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका खूप कमी होतो. मात्र, मर्यादेपेक्षा जास्त खाऊ नये कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

5. पिवळी भोपळी मिरची  (Bell Pepper)


या अन्नामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, आयर्न आणि फोलेट आढळतात, ज्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि त्याच वेळी शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही आणि हृदय देखील निरोगी राहते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी