Egg Side Effects । मुंबई : अंडी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. त्यामुळेच 'संडे असो की मंडे रोज खा अंडे' असे बोलले जाते. दरम्यान काही लोकांचा असा समज आहे की जास्त अंडी खाल्ल्याने नसांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे अंड्याना सुपरफूड देखील म्हटले आहे. मात्र अंड्यांचे जास्त प्रमाणात केलेले सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय काही लोकांना अंड्यांची ॲलर्जी देखील असते. (Eating too many eggs every day is bad for your health).
अधिक वाचा : फक्त ऑरेंज कॅपच नाही तर जोस बटलरने जिंकले आणखी ६ अवॉर्ड
चांगले कोलेस्ट्रेरॉल शरीराच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते जे अंड्यांमध्ये चांगल्या प्रमाणात आढळते. पण खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच एलडीएलच्या अतिसेवनामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका निर्माण होतो. अंडी शरीरासाठी खूप फायदेशीर असतात मात्र त्यांचे सेवन अधिक प्रमाणात केल्याने त्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात.
दरम्यान, जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्याने पोटात सूज येऊ शकते. त्यामुळे एका दिवसात २ पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत. दिवसभरात २-३ पेक्षा जास्त अंडी खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. तसेच जास्त अंडी खाल्ल्याने त्वचेवर फोड्या येऊ शकतात, तर काही लोकांना संपूर्ण त्वचेवर फोड्यांची ॲलर्जी होऊ शकते. जास्त अंडी खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम होतो. त्यामुळे डायबिचीजची समस्या वाढण्याची शक्यता आहे. अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने चेहऱ्यावर मुरुम येऊ शकतात.
आरोग्य तज्ञांच्या मते एका दिवशी एक अंडे खाणे पुरेसे आहे, जर तुम्ही नियमित अंडी जास्त प्रमाणात खात असाल तर त्याचा प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. अंडी खाल्ल्याने वाईट कोलेस्टेरॉलवर फारसा परिणाम होत नसला तरी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक योग्य नाही. अंड्याची चव गरम असल्याने ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने इतर काही समस्या उद्भवू शकतात.
डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.