Disadvantages Of  Potatoes: बटाट्याचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने या गंभीर आजारांचा धोका, होऊ शकते मोठे नुकसान

Disadvantages Of  Potatoes । बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते. जर तुम्ही देखील बटाट्याचे जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

Eating too much potato can lead to serious illness and serious harm
बटाट्याचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने गंभीर आजारांचा धोका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते.
  • बटाट्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात.
  • बटाटे कार्बोहायड्रेट्सने परिपूर्ण असतात.

Disadvantages Of  Potatoes । मुंबई : बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते. जर तुम्ही देखील बटाट्याचे जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आरोग्य तज्ञ म्हणतात की जर तुम्ही बटाट्याचे मर्यादित स्वरूपात सेवन केले तर याचा तुम्हाला चांगला फायदा होतो, मात्र जास्त प्रमाणात याचे सेवन केले तर नुकसान देखील होण्याची शक्यता आहे. (Eating too much potato can lead to serious illness and serious harm). 

अधिक वाचा : मंगळवारच्या दिवशी हे काम करणे टाळा; जीवनात येतात वाईट संकटे

बटाट्यांमधील पोषक घटक 

बटाट्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात, यामध्ये फायबर, जिंक, आयरन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. याशिवाय बटाट्यांमध्ये कॅरोटीनॉयड्स, फ्लेवनॉयजड्स आणि फिनोलिक ॲसिड सारखे अँटी-ॲक्सिडेंट्स असतात. जे तुमच्या आरोग्याशी संबधित समस्यांपासून वाचण्यासाठी मदत करू शकतात, मात्र याचे मर्यादित स्वरूपात सेवन करणे गरजेचे आहे. सोलनम ट्युबरोसम (Solanum Tuberosum) हे बटाट्याचे वैज्ञानिक नाव आहे. लक्षणीय बाब म्हणजे याचा उपयोग संपूर्ण जगात एक प्रमुख आहार म्हणून केला जातो. बटाटे प्रामुख्याने ॲंडिज, पेरू आणि बोलिव्हियामध्ये आढळतात. 

अधिक वाचा : फोटोत लपलेल्या मुलीचे नाव ओळखताना भल्याभल्यांना फुटला घाम

बटाटे खाण्याचे दुष्परिणाम

एनडीटिव्ही फूडने दिलेल्या वृत्तानुसार, बटाट्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने लोकांना लठ्ठपणाचा त्रास जाणवू शकतो. दरम्यान बटाटे कार्बोहायड्रेट्सने परिपूर्ण असतात. कार्बोहायड्रेट्सचे जास्त सेवन केल्याने कॅलरीजचे प्रमाण वाढते, ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो. जास्त प्रमाणात बटाट्याचे सेवन केल्याने सांधेदुखी असलेल्या रूग्णांना अधिक त्रास होऊ शकतो. त्यात आढळणारे कार्बोहायड्रेट सांधेदुखीचा त्रास वाढवतात. 

दरम्यान, ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या लोकांनी बटाट्याचे सेवन कमी प्रमाणात करणे गरजेचे आहे. कारण अधिक सेवन केल्याने समस्या आणखी वाढू शकते. लक्षणीय बाब म्हणजे जास्त प्रमाणात बटाट्याचे सेवन केल्याने डायबिटीज ग्रस्तांची समस्या आणखी वाढू शकते. निळ्या रंगाचे किंवा अंकुरलेले बटाटे खाल्ल्याने शरीरात ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी