Weight Loss : वजन कमी करण्यासाठी 'या' वेळेत करा जेवण, फटाफट होईल वेटलॉस!

वजन कमी करण्यासाठी जेवण्याची उत्तम वेळ कुठली, असा प्रश्न अनेकांना पडतो. भूक लागल्यावर जेवणे हेच त्याचं उत्तर असून शास्त्रज्ञांनी एका प्रयोगातून सिद्ध करून दाखवलं आहे.

Weight Loss
वजन कमी करण्यासाठी ‘या’ वेळी करा जेवण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जेवणासाठी योग्य वेळ समजणं गरजेचं
  • भूक लागते तीच वेळ असते सर्वात योग्य
  • उपास आणि इमोशनल डाएटिंगमुळे वाढतं वजन

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) अनेकजण जेवण कमी (Diet) करतात. काहीजण तर चक्क उपास धरतात आणि अक्षरशः काहीही खाणं टाळतात. वास्तविक, असं करणं हे आरोग्यासाठी हानीकारकच (Dangerous) असतं. अतिखाणं आणि अचानक डाएट सुरु करून खाणंच बंद करणं हे दोन्ही पर्याय उत्तम आरोग्यासाठी चांगले नसतात. काहीजण तर कार्बोहायड्रेट आणि फॅट असणारे पदार्थ खाणंच बंद करतात आणि वजन कमी होण्याची वाट पाहत बसतात. मात्र अशा प्रकारांमुळे केवळ अशक्तपणा येतो आणि वजन मात्र कमी होत नसल्याचा अनुभव येतो. त्यामुळे योग्य वेळी योग्य प्रकारचा आहार घेणं, हाच वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. आहार काय घेतो याला जितकं महत्त्व आहे तितकंच तो कुठल्या वेळी घेतो, यालाही महत्त्व असल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात. 

जेवण्याची योग्य वेळ कुठली?

भूक लागल्यावर खाणे हीच खाण्याची उत्तम आणि सर्वात योग्य वेळ असल्याचं तज्ज्ञ सांगतात. जेव्हा भूक लागते तेव्हा आपलं शरीर अन्न पचवण्यासाठी नैसर्गिकरित्या तयार झालेलं असतं. अशावेळी शरीरात पोषक आहार जाणं आवश्यक असतं. भूक लागल्यावर जर प्रमाणात आणि पौष्टिक आहार घेतला तर वजन कमी होण्याच्या प्रक्रियेला सुुरुवात होते आणि वेगाने वजन कमी होऊ लागतं. मात्र भूक नसताना जर खालेल्लं अन्न पचायला मात्र वेळ लागतो. भूक लागल्यावर खाण्याची सवय असलेल्या व्यक्तींचं वजन हे इतरांच्या मानाने वेगाने कमी होत असल्याचं दिसून आलं आहे. 

अधिक वाचा - Nail indicates health : वारंवार नखं तुटतायत? असू शकतात गंभीर आजाराची लक्षणं

संशोधनातून समोर आलं तथ्य

याबाबत करण्यात आलेल्या एका संशोधनात 8 देशातील 6000 पेक्षा अधिक प्रौढ नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये तीन गट पाडण्यात आले. पहिला गट होता इमोशनल इटिंग करणारे, दुसरा गट होता उपास करणारे आणि कॅलरीचा हिशोब ठेऊन खाणारे आणि तिसरा गट होता भूक लागल्यावर खाणारे. यापैकी तिसऱ्या गटातील लोक अधिक खूश राहत असून त्यांचं वजन झपाट्याने कमी होत असल्याचं दिसून आलं. 

अधिक वाचा - Weight Loss Tips in Marathi: वजन कमी करण्यासाठी हे पाच पदार्थ करा दूर, अन्यथा केलेली मेहनत होईल बरबाद

उपासाचे होतात दुष्परिणाम

वजन कमी करण्याच्या ईर्ष्येने काहीजण उपवास करताना दिसतात. केवळ फळं खाऊन किंवा विशिष्ट एखाददुसरा पदार्थ खात काही महिने काढण्याचा निर्णय ते घेतात. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम होऊन त्यांचं वय अचानक वाढल्यासारखं दिसू लागतं. काहीजणांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर सुरकुत्या पडण्याचीही शक्यता असते. शिवाय काही काळाने उपासाचा संयम सुटतो आणि आहार पूर्ववत झाल्यावर आधीपेक्षाही जास्त वजन वाढल्याचे अनुभव येतात. काहीजण इमोशनल इटिंग करत असल्याचं दिसतं. निराशेच्या गर्तेत असणाऱ्या व्यक्ती विशेषतः इमोशनल इटिंग करतात आणि त्यामुळे त्यांचं वजन वाढतं. सर्वात उत्तम आरोग्य हे भूक लागल्यावर अन्न खाणाऱ्यांचं असतं, असं या संशोधनातून दिसून आलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी